पहतेचे सोंदर्य निबध मराठी 2, 3 पेजेस
Answers
Explanation:
पहाटेच सौंदर्य खूप छान, रम्य असते. या वेळी संपूर्ण आकाश नारंगी रंगाने भरलेला असतो. पूर्व दिशेत सूर्य उगवताच दिवसाची सुरवात होते, अंधार नष्ट होऊन फक्त प्रकाशच असतो. या वेळी ताजी, स्वच्छ, मंद, सुगंधित हवा वाहत असते. म्हणूनच या वेळी लोक सैर करतात, व्यायाम करतात. या समयी हवेत ऑक्सीजन भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. म्हणूनच पहाटे व्यायाम व सैर केल्यामुळे मनुष्य निरोगी राहतो.
पहाट होताच पक्षी आपल्या घरट्यातून बाहेर निघतात व चारा शोधण्यास जातात. त्यांचा चिवचिवा हाट आपणास ऐकायला येतो. पहाट होताच कोंबडा आरवतो. घरच्या स्त्रिया आंगन सारवतात, रांगोळी घालतात. शेतकरी आपल्या बैला सोबत शेतात काम करायला निघतो. बैलांच्या गळ्यात बांधलेल्या घुंगरूंचा मधुर आवाज कानात पडत असतो. दूर मंदिरातून भूपाळीचा आवाज ऐकतो. सर्व लोक आपल्या कामाची सुरवात करतात.
पहाट होताच फूल उगवतात. सर्वी कडे वातावरण अगदी प्रसन्न असते. या वेळी जर विद्यार्थी लवकर उठून अभ्यास करतो तर अभ्यास त्याच्या लवकर लक्षात येते.