India Languages, asked by parkashgaurav5116, 1 year ago

pahila paus nibandh Marathi - पहिल्या पावसावर निबंध

Answers

Answered by biologyking1977
77

✔️✔️ ANSWER ✔️ ✔️

✔️✔️पहिल्या पावसावर निबंध✔️✔️

पहिला पाऊस आला की एखादा लहानपणीचा बालमित्र ब-याच दिवसांनी भेटावा असं वाटतं. हवाहवासा दोस्त भेटल्यावर जो आनंद होतो, तोच आनंद मला पहिला पाऊस आल्यावर वाटतो.

कुणाला सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरायची हौस असते, तर कुणाला रात्रीच्या दाट चांदण्यात फिरायची हौस असते, तर कुणाला संध्याकाळच्या गार हवेत फिरायची हौस असते. मला मात्र पहिल्याच पावसात भिजत-भिजत भटकायची हौस आहे. कारण पहिला पाऊस येतो तो कोवळ्या उन्हातल्यासारखा गारांचा अंगणात सडा घालीत.

आपण एखाद्या मित्राची वा पाहुण्याची बराच वेळ वाट बघत असतो. पण ठरल्यावेळी ठरल्या दिवशी तो येत नाही. काही अडचण असेल, असं समजून तो उद्या येईल असं आपण आपल्या मनाचं समाधान करतो, पण तो दुस-या दिवशी पण येत नाही. मग लागोपाठ चार-पाच दिवस झाले तरी येत नाही. आपली निराशा होते. काळजी वाटते, काय झालं असेल. कळवलंसुद्धा नाही. मग आपण त्याची वाट पाहायची सोडून देतो. त्याला जवळजवळ विसरतो. पण आतल्या आत मनाची घालमेल होतच राहते. मग बहुतेक तो उशिरा येईल किंवा येणारच नाही अशी मनाची अटकळ करतो आणि आपल्या कामाच्या धबडग्यात खरंच त्याला विसरून जातो आणि मग एके दिवशी अचानक पत्र वा तार यावी असा तो येतो.

मला शहरापेक्षा गावाकडच्या पहिल्या पावसाचं फार वेड आहे. गावाकडं आपुलकीनं भरून आलेलं आभाळ पाहायला मिळतं. सावळे मेघ प्रत्यक्ष डोळे भरून पाहता येतात. झाडे पावसाची वाट बघत त्याच्या स्वागताला आतुरलेली बघता येतात. पक्षी झाडावर घरटी बांधून त्याची चाहूल देताना आपण आश्चर्याने अवाक् होतो. उन्हाळयात पोळलेला माळ त्याची तर आतुरतेने वाट बघत असतो. माणसं घरे-दारे शाकारून त्याच्या येण्याची प्रार्थना करतात.

वारा त्याच्या आगमनाची शिट्टी वाजवत असतानाच आपण गावाबाहेर उघडया माळावर भटकायला गेलो तर पहिल्या पावसात भिजण्याची लज्जत आणखी वाढते. मी तर मोरासारखा वेडा होऊन नाचतो.

I HOPE THIS INFO HELPS YOU ☺️☺️☺️☺️

#TEJ

Answered by Mandar17
51

उन्हाळ्याने बेहाल झालेल्या सर्व  किट, पशु, पक्षी, मनुष्य सर्व प्राण्यांना पहिला पाऊस केव्हा येतो याची आतुरता असते. पहिल्या पाण्यात भिजण्याचं  आनंद गगनात मावेनासा होतो. शेतकरी बांधवाना पहिला पाऊस म्हणजे त्यांचा  आशेची किरणच असते.  

लहान मुलांना पहिल पाऊस येणे म्हणजे त्यांचा मित्र कित्येक दिवसांत त्यांचा सोबत खेळायला आलाय असाच होते, तेही पहिल्या पाण्याचा मनसोक्त स्वागत आपली कमीज काढून आणि पाठीवर पहिल्या पाण्याचा थेम्ब जिरवून करतात. दुष्काळ जाणित भागात पहिले पाऊस येणे म्हणजे नशिबाची चाल बदलणे असेच गृहीत  धरले जाते.  

ग्रामीण भागात पहिल्या पाण्याची चाहूल लागताच, आनंदसोबतच ग्रामीणस्थ मंडळी आपल्या घरावरील छपराचा तपशील घेतात, पेरणी कशी आटोपती घेता येईल ह्याकडे त्यांचा कौल जातो. शहरी भागात उन्हाळ्याचा भीषण तावडीतून सुटका होणार हे जाणूनंच कित्येक लोक आनंदी होतात.  

खरंच पहिल्या पाण्याची जादू जरा निराळीच, पूर्ण वातावरण आनंदी आनंद  गाडे, इकडून तिकडे चोहीकडे असेच होते.

Similar questions