India Languages, asked by ashokeee750, 10 months ago

Paisa he sadhan ahe sadhya nahi in marathi

Answers

Answered by bestanswers
7

        पैसा हे साधन आहे साध्य नाही.

अनेक लोक अधिकाधिक सुख मिळावं म्हणून खूप पैसे मिळवायच्या मागे लागतात. त्या पैशाने ते अनेक भौतिक सुख खरेदी करू शकतात पण त्या सुखांचा उपभोग घेताना मनाचं समाधान हरवून बसतात.  

अनेकवेळा आपण पाहतो गरीब माणूस आहे त्यात समाधान मानून आनंदी राहतो आणि श्रीमंत माणूस सगळं असूनही सतत आणखी सुख कसं मिळवता येईल याचाच जास्त विचार करत राहतो आणि तो मिळाला नाही की दुःखी कष्टी होतो.  

पैसा सुख खरेदी करू शकतो पण समाधान नाही. आपल्याला आयुष्यात नक्की काय हवंय याचा आपण आधीच विचार केला पाहिजे. म्हणजे मग पैशाच्या मागे न लागता माणूस समाधान कशात आहे याचा शोध घेईल. पैसा हे सुख मिळवण्याचं साधन असू शकतं पण  साध्य नाही.

Similar questions