पक्षी आणि पारधी याचे तात्पर्य सांगा.
Answers
Answer:
एक पारधी अरण्यात पक्षी धरण्यासाठी जाळे लावत असता जवळच झाडावर बसलेला एक पक्षी त्याला विचारू लागला, 'अरे, हे तू काय करतो आहेस?' यावर पारधी म्हणाला, 'तुमच्यासारख्या पक्ष्यांकरता हे शहर बांधतो आहे. यात जे पक्षी येऊन राहतील त्यांना कोणत्याही गोष्टीची अडचण पडणार नाही. चारा, पाणी चिकार असेल. राहायला तरतर्हेची घरं अन् झोपायला मऊ गादी असेल.' पक्षाला ते सर्व खरे वाटले व पारधी जाताच तो त्या जाळ्यात शिरला व अडकला.
ते पाहून बरेच पक्षी जमा झाले तेव्हा त्या सर्वांना त्याने सावध केले. तो सांगू लागला, 'यात मी फसून सापडलो, तो पारधी गोड गोड बोलून तुम्हालाही भुलविण्याचा प्रयत्न करेल. त्यावर तुम्ही विश्वास ठेऊ नका.' हे ऐकून सगळे पक्षी निघून गेले. काही वेळाने पारधी येताच तो पक्षी त्याला म्हणाला, 'अरे लबाडा, तू मला फसवलेस, पण तुझ्या या सुंदर शहरात आता एकही पक्षी राहायला येणार नाही, याबद्दल खात्री असू दे !'
तात्पर्य - लबाड लोकांची लबाडी जोवर लक्षात येत नाही तोवर ते दुसर्याला फसवू शकतात पण लबाडी उघडकीला आली की लोक त्याच्या वार्यालाही उभे रहात नाहीत.
Explanation:
एक पारधी एका अरण्यात पक्षी धरण्यासाठी जाळे मांडीत असता, जवळच एका झाडावर पक्षी बसला होता, तो त्यास पुसतो, ‘अरे, हे तू काय करीत आहेस ?’ पारधी उत्तर करतो, ‘हे तुम्हां पक्ष्यांकरिता मी शहर बांधीत आहे; यात जे पक्षी येऊन राहतील त्यांस कोणत्याही गोष्टीची अडचण पडणार नाही. येथे चारा आहे, पाणी आहे आणि राहावयास नाना प्रकारची सुंदर घरे आहेत, निजावयास मऊ आणि उबदार असे बिछाने आहेत. ’ पक्ष्यास ते सगळे खरे वाटेल आणि पारधी जाळे मांडून गेल्यानंतर तो त्यांत शिरला आणि अडकून राहिला ! तो प्रकार पाहून पुष्कळ पक्षी जमा झाले, त्या सर्वांस त्याने सांगितले, ‘अरे, संभाळा. हे येथे जाळे पसरून ठेवले आहे; यात मी फसुन सापडलो. तो पारधी गोड गोड बोलून आणि खोटया गोष्टी सांगून तुम्हांस भुलविण्याचा प्रयत्न करील. तर त्याच्यावर तुम्ही मुळीच विश्वास ठेवूं नका. ’ हे ऐकून सगळे पक्षी ते ठिकाण सोडून चालते झाले. काही वेळेने तो पारधी पुन: तेथे आला, तेव्हां पक्षी त्यास म्हणतो, ‘लुच्चा ! तू मला तर ठकविलेस, पण यापुढे तुझ्या या सुंदर शहरात राहण्यास दुसरा एकही पक्षी कधी येणार नाही, याबद्दल तुझी खात्री असू दे.’