पक्षी बोलू लागले तर एसी व निबंध इं मरा इं मराठी
Answers
उत्तर :
मला वाटते की पक्षी बोलू शकतात तर ते अशा अंतर्दृष्टी देऊ शकतात की ते सर्व सामाजिक नियमांपासून आणि जगाच्या सर्व नकारात्मकतेतून कसे मुक्त होते. जगाला निसर्गाला अर्पण करणार्या रोजच्या जीवनाचा आनंद कसा अनुभवतो? कदाचित अधिक स्वतंत्रपणे कसे जगता येईल आणि त्या सौंदर्यासाठी दररोज शोध कसा करायचा याबद्दल कदाचित माहिती सामायिक करा, कदाचित अशा गोष्टी दिसतील ज्या आपण कधीही विचारल्या नाहीत. जर पक्षी सत्य बोलू लागला तर या जगातील कोणीही त्यांना स्पर्श करणार नाही परंतु पक्षी त्याचा त्रास व्यक्त करू शकत नाही, परंतु जर ती बोलू लागते तर ती तिच्या पिंजर्यात राहण्याचे धूर आणि वेदना सांगेल. आणि मी म्हणतो की ते चांगले होणार नाही आणि आम्ही तणाव हाताळण्यास मदत करतो कारण मनुष्य दररोज अभ्यास करतो.
Answer:
मी माझ्या छोट्या भाच्याला काऊचिऊची गोष्ट सांगत होते. गोष्ट संपल्यावर तो मला म्हणाला, "आत्या, गोष्टीतील काऊ मला रोज दिसतो ग ! पण ती चिऊताई कोठे गेली आहे ?" आणि तेव्हा मला जाणवले की खरोखर हल्ली चिमण्या कुठे फारशा दिसत नाहीत हं ! कुठे गेल्या असतील या चिमण्या? आमच्या लहानपणी अंगणात चिमण्या आमच्याबरोबर खेळत असत. कुणीतरी सांगितलेले आठवले की, माणसांच्या वाढत्या मोबाईल दूरध्वनी यंत्रणेचा परिणाम चिमण्यांवर झाला आहे. खरोखर हे पक्षी माणसांशी बोलू लागले तर... तर काय सांगतील ते?
असा विचार माझ्या मनात येतो न येतो, तोच अनेक पक्षी घिरट्या घालत माझ्या भोवती जमा झाले. "माणसांनो, आम्ही काय बिघडवलं होतं बरं तुमचं?" पक्षी बोलत होते. "तुम्ही असे आमच्या जीवावर का उठला आहात बरे ! अरे हे जग जसे तुमचे आहे, तसे ते आमचेही आहे ! पण तुम्हांला आपल्या बुद्धिमत्तेचा फार मोठा गर्व आहे ना ! तुम्ही विज्ञानाच्या साहाय्याने नवेनवे शोध लावता आणि आमचे जिणे असह्य करता. पाहा ना ! हे सारे वातावरण तुम्ही किती प्रदूषित केले आहे ! अणुशक्तीचा वापर संहारासाठी करून तुम्ही जणू सारे जग नष्ट करायलाच निघाला आहात ! ज्या आकाशात आम्ही आनंदाने विहार करतो, त्या आकाशावर आक्रमण तुम्ही केले आहे. तुम्हांला आमच्यासारखे पंख नाहीत, आमच्यासारखे उडता येत नाही. म्हणून तुम्ही विमानांचा शोध लावलात. तुमच्या या विमानांचा तो प्रचंड आवाज ! आमच्या या सुंदर जगातील शांतताच त्याने गिळंकृत केली आहे. विमानांप्रमाणेच आता तर तुम्ही तुमची क्षेपणास्त्रे आकाशात पाठवू लागला आहात. आणि तुम्ही निर्माण केलेले उपग्रह तर आता अंतराळात जाऊन वास्तव्य करतात. अरे शहाण्या माणसा, तुम्हीच आम्हांला 'खग' म्हणता. 'खग' म्हणजे आकाशात गमन करणारा. पण आता आम्हा 'खगां'ना हाकलून या आकाशातही वसाहती उभारण्याचे तुमचे बेत आहेत म्हणे !
अरे माणसा, तू किती निर्दयी झाला आहेस बघ ! अरे, या भूलोकावर आम्ही झाडांवर वास्तव्य करतो. झाडांवर घरटी बांधून आम्ही सुखात राहतो, आमच्या बाळांना मोठे करतो पण तुम्ही माणसांनी जंगलतोड करण्याचा सपाटा लावला आहे. झाडे तोडता, जुने वाडे पाडता आणि सिमेंटची जंगले उभी करता. मग सांगा बरं - आम्ही आमची घरटी कोठे बांधायची ! तुम्ही माणसे एवढी निष्ठुर होता की, तुमच्यातील काही माणसे आमच्या लुसलुशीत मांसावर तुटून पडतात. तुला माहीत आहे का की, आमच्यातील काही जाती आता पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत? काही माणसे आमच्यावरील अतोनात प्रेमामुळे आम्हाला पिंजऱ्यात टाकतात आणि आमचे स्वातंत्र्य कायमचे हिरावून घेतात. खरंच सांगा आम्ही काय बिघडवलयं तुमचं !" पक्ष्यांच्या या भडिमाराने मला विचारात पाडले, हे मात्र खरे !