Geography, asked by nitinratnaparkhi9271, 3 months ago

पक्षांची श्वसन इंद्रिय कुठे असते​

Answers

Answered by namdevgarje0gmailcom
1

Answer:

पक्ष्यांचे श्वसन तंत्र दोन फुफ्फुसे आणि कित्येक वायुकोश यांचे बनलेले असते. फुफ्फुसे सापेक्षतेने लहान असतात व त्यांचे प्रसरण आणि आकुंचन थोडे होते. वायुकोश मोठे असून देहगुहेत (शरीराच्या पोकळीत) असतात व त्यांच्या भित्ती अतिशय पातळ असतात. त्यांच्यापासून अंधवर्ध (एका टोकाशी बंद असलेल्या नलिका वा पिशव्या) निघालेले असून ते पसरून बहुधा ऊर्वस्थी, भुजास्थी आणि मणके यांत गेलेले असतात; परंतु काही जातींत ते कंकालाच्या कोणत्याही भागात, पायांच्या बोटांत सुद्धा गेलेले असतात. सस्तन प्राण्यांतल्याप्रमाणे श्वसनाला मदत करणारे मध्यपटल (छाती व उदर यांच्यामधील स्नायुमय विभाजक पडदा) पक्ष्यांमध्ये नसते, म्हणून त्याकरिता ते देहभित्तीच्या प्रसरणावर व आकुंचनावर अवलंबून असतात.

अंतःश्वसनामध्ये (हवा आत घेण्याच्या क्रियेमध्ये) हवा मुखातून अथवा नासाद्वारांतून श्वासनालात (मुख्य श्वासनलिकेत) शिरते आणि श्वसन्यांमधून फुफ्फुसात जाते; बरीचशी हवा फुफ्फुसातून पलीकडे वायुकोशात जाते. उच्छ्‌वसनामध्ये (हवा बाहेर सोडण्याच्या क्रियेमध्ये) वायुकोशांवर वक्षाच्या व उदराच्या स्नायूंचा दाब पडल्यामुळे त्यांच्यातली बरीचशी हवा पुन्हा फुफ्फुसातून जाते. श्वसन्यांचा शेवट सूक्ष्म वायु-केशिकांनी (केसासारख्या बारीक वायुनलिकांनी) होतो. या केशिकांना रक्ताचा भरपूर पुरवठा असून त्यांच्यात ऑक्सिजन आणि कार्बन डाय-ऑक्साइड यांची अदलाबदल होते. शरीर हलके करणे हे वायुकोशांचे कार्य आहे असा समज होतो; पण हे त्यांचे मुख्य कार्य नसून आंतरिक बाष्पीकरणाने अथवा उष्णतेच्या विसरणाने (विखुरण्याने) शरीर थंड करणे, हे त्यांचे महत्त्वाचे कार्य आहे.

पक्ष्याच्या श्वासोच्छ्‌वासाचे प्रमाण बदलणारे असून, ते तडफ मनःक्षोभ व परिस्थितीजन्य गोष्टींवर अवलंबून असते. पाळीव कोंबड्यांमध्ये हे प्रमाण दर मिनिटाला १२-३७ आणि कॅनरी पक्ष्यात ९६ ते १२० असते, तथापि हे प्रमाण पक्ष्याच्या तापमानाबरोबर बदलते. शरीराचे ४१.७० से. तापमान असलेले एक कबूतर मिनिटाला ४६ वेळा श्वासोच्छ्‌वास करीत असल्याचे दिसून आले; परंतु त्याचे तापमान वाढून ४३.३० से. झाल्यावर ते दर मिनिटाला ५१० वेळा श्वासेच्छ्‌वास करू लागले.

Similar questions