Hindi, asked by sawantashwin3, 18 days ago

पक्ष ५-चित्रातील व्यत्ती काय करीत आहे ? असे करण्याचा हेतू काय असेल ? या आंदोलनाची सुरुवात कोणी केली? ( गुण ३)​

Answers

Answered by Gaganmeetkaur
15

Explanation:

एखाद्या जिवंत वा मृत व्यक्तीची कलावंताने साकारलेली प्रतिमा म्हणजे ‘व्यक्तिचित्र’ (पोटर्रेट) व प्रतिमांकनाची कला म्हणजे ‘व्यक्तिचित्रण’. व्यक्तिचित्र हे चित्र वा शिल्प या कलाप्रकारांत असू शकेल. तद्वतच ते तैलरंग, जलरंग, पेन्सिल, रंगशलाका (रंगीत खडू वा कांडी) अशा कोणत्याही साधनाने चितारलेले अथवा मृत्तिका, धातू, प्लास्टर, संगमरवर यांत घडवलेले असू शकेल. हे व्यक्तिचित्र शीर्ष वा चेहरा, पूर्णाकृती वा अर्धपुतळा (बस्ट) अशा कोणत्याही रूपात असू शक

व्यक्तिचित्रणाच्या वेगवेगळ्या पद्धती व शैली निर्माण होत गेल्या. व्यक्तिचित्रणातून इतिहास, तत्कालीन समाजजीवन इत्यादींसंबंधी माहिती मिळू शकते, हे महत्त्वाचे आहे.

व्यक्तिचित्रणात सुरुवातीपासूनच सर्वसाधारणपणे दोन प्रकार आढळतात : (१) व्यक्तीचे हुबेहूब साम्य दाखविणारी म्हणजे वास्तवदर्शी प्रतिमा व (२) व्यक्तीचे आदर्श रूप दाखविणारी प्रतिमा. आलटून-पालटून यांपैकी एकेक पद्धत अनेक देशांत वेगवेगळ्या काळांत स्वीकारली गेली व तिच्यामध्येही वेगवेगळे बदल होत गेले

प्रागैतिहासिक काळात जादूटोण्याकरिता जनावरांच्या वास्तव प्रतिमा काढल्या जात; पण मानवावर जादूटोणा लागू होऊ नये म्हणून मानवी प्रतिमा मात्र निर्माण झाल्याचे दिसत नाही. ज्या होत्या त्या मातृदेवतांच्या रूपात व सांकेतिक होत्या. मृताच्या कबरीतील मृताची प्रतिमा कवड्या, शिंपले तसेच निसर्गातील इतर वस्तू किंवा मृत्तिका वापरून तयार केल्याचे दिसते. त्यांत वास्तवापेक्षा सांकेतिक रूप दिसते

प्राचीन ईजिप्त, मेसोपोटेमिया (इराक), पर्शिया (इराण) येथील व्यक्तिचित्रणांत सम्राट, नेते अगर महत्त्वाच्या व्यक्तींचे आदर्शवादी रूपच दिसून येते. ईजिप्तमधील पिरॅमिडांतून राजांचे मृतदेह जतन करून ठेवले जात व त्यांबरोबर त्यांची अनेक व्यक्तिशिल्पे मूळ प्रतिमेस इजा झाल्यास उपयोगी पडावी म्हणून ठेवली जात. केसांची विशिष्ट टोपीसारखी रचना व मोठे जडविलेले डोळे, बाजूचा चेहरा व समोरचा डोळा, समोरून दिसणारे खांदे असे मिश्रण रूपांत दाखविलेले आढळते. मात्र एरलोटॉन या सम्राटाच्या काळात वास्तव रूप व नैसर्गिक आविर्भाव दाखविले गेले. राणी हॅटशेपसूट हिचे सुंदर शीर्षशिल्प उंच मान, रेखीव चेहेरा व उंच टोप या रूपात आढळते. मात्र लवकरच पुन्हा जुन्या परंपरेनुसार व्यक्तिचित्रे व शिल्पे होऊ लागली. अॅसिरियन व्यक्तिशिल्पांत आदर्श, करारी चेहरा व बळकट शरीरयष्टी दाखविली

प्राचीन ग्रीसमध्येही सुरुवातीच्या काळात व्यक्तिचित्र-शिल्पांतून आदर्श रूप रेखाटण्यावर भर देण्यात आला. ग्रीकांनी आपले नेते, तत्त्ववेत्ते, लेखक, कवी, सेनापती यांची व्यक्तिशिल्पे निर्माण केली. इ. स. पू. तिसऱ्यार शतकानंतर यांत वास्तवता व व्यक्तिसाम्य आलेले दिसते. अंध होमर व डिमॉस्थिनीझ यांची व्यक्तिचित्रे या प्रकारची आहेत. इ. स. पू. दुसऱ्या शतकापासून गोल नाण्यांवर उत्थित शिल्पांकनातील व्यक्तिशिल्पे दिसू लागली

रोमन लोकांमध्ये घरातील व्यक्ती मृत पावली की, तिच्या चेहऱ्याचचा बदल घडवून आणला. जॉत्तोनेच प्रथम व्यक्ती समोर ठेवून त्यावरून मानवी शरीररचनेचा अभ्यास केला, असे मानले जाते. जॉत्तोपासून प्रेरणा घेऊन पंधराव्या शतकात प्रबोधनकालीन चित्रकारांनी व शिल्पकारांनी व्यक्तींची वास्तव रूपे दाखविण्यास सुरुवात केली.

फ्लेमिश चित्रकार यान व्हान आयिक (सु.१३९०–१४४१) याने व्यक्तिचित्रात प्रथमच तीन चतुर्थांश चेहरा बारकाव्यांसहित दाखवून या कलेला मोठीच कलाटणी दिली. तद्वतच इटलीतील शिल्पकार दोनातेलो (१३८६–१४६६) व चित्रकार माझात्चो (१४०१–२८) यांनी व्यक्तिचित्रणाला भावदर्शनाची जोड देऊन भव्योदात्त परिणाम साधणारी व्यक्तिचित्रे व व्यक्तिशिल्पे निर्माण केली. दोनातेलो व व्हेरोक्क्यो (१४३५–८८) यांनी पूर्णाकृती अश्वारूढ व्यक्तिशिल्पांत रुबाबदार आविर्भाव व आदर्श रूपसौष्ठव प्रकट केले.सोळाव्या शतकात प्रबोधनाच्या उत्कर्ष काळात व्यक्तीचे आदर्श रूप व अर्थपूर्ण आविर्भाव यांच्या रचनेतून सुंदर परिणाम साधण्यावर कलावंतांनी भर दिला उदा., मायकेल अँजेलोन (१४७५–१५६४) घडवलेली मेदीची-कबरीतील लोरेन्झो व ज्यूल्यानो यांची व्यक्तिशिल्पे ही वास्तव रूपापेक्षा कल्पित आदर्श रूपावर जास्त भर देणारी आहेत. तर लिओनार्दो दा व्हींची (१४५२–१५१९) यांचे मोनालिसा (१५०३–०५) हे प्रख्यात चित्र गूढरम्य स्त्री-सौंदऱ्याची चित्रकाराची आदर्श कल्पना साकार करते. याउलट व्हेनिस येथील तिशन (सु. १४८८–१५७६), तिंतोरेत्तो (सु. १५१८–९४) व पाओलो व्हेरोनेझे (१५२८–८८) या चित्रकारांनी व्यक्तीशी हुबेहूब साम्य रेखाटून त्यातून नाजूक त्वचेचा पोतही दर्शवला.या काळात व्यक्तित्रित्रे व रेखाटने यांचे संग्रहही प्रसिद्ध केले गेले. पाओला जोव्ह्यो याच्या व्यक्तिचित्रांचा अम्लरेखनातील प्रतिकृतींचा संग्रह सोळाव्या शतकात प्रसिद्ध झाला. दुसरा महत्त्वाचा संग्रह म्हणजे कानेरीना दे मेदीची हिच्याजवळील ३४१ व्यक्तिचित्रांचा तिच्या मृत्यूनंतर संकलित केलेला संग्रह होय. प्रबोधन काळातील आणखी एक लक्षणीय प्रवृत्ती म्हणजे प्रतिष्ठित स्त्री-पुरुष स्वत:ला देव-देवतांच्या रूपात कल्पून स्वत:चे व्यक्तिचित्र योग्य प्रतीकांसहित तयार करून घेत असत.

Answered by sunilwathor198
0

i don't know what is the answer

Similar questions