पक्षी व पर्यावरणामधील संबंध स्पष्ट करा
Answers
सामान्यपणे मानवास व शेतीस हानिकारक असणार्या कीटकांचा समावेश पक्ष्यांच्या अन्नामध्ये होतो. अनेक प्रजातींचे पक्षी फक्त कीटकच खात नाहीत, तर त्यांची अंडीही मोठ्या प्रमाणावर फस्त करून टाकतात. त्यामुळे वेगवेगळ्या अवस्थेतील कीटक उदा. अंडी, अळी, कोष, पूर्ण कीटक हे पक्ष्यांकडून खाल्ले जातात, त्यामुळे कीटकांची संख्या नियंत्रित राखण्यास मदत होते...
आजच्या बिहार राज्यातील पुसा येथील ‘अॅग्रिकल्चर रीसर्च इन्स्टिट्यूट’मधील सी. डब्ल्यू. मॅसन आणि एच. मॅक्सवेल लेफ्रॉय या कीटकशास्त्रज्ञांनी ‘भारतातील पक्ष्यांचे अन्न’ या विषयावर विसाव्या शतकाच्या प्रारंभी संशोधन केले. त्यात त्यांना असे आढळून आले की; शेतातील पिकांवर येणारे अनेक पक्षी असे आहेत की, ज्यांचे खाद्य प्राधान्याने पिकांवरील कीड आणि कीटक हे आहे; तर शेतामधील उत्पादित धान्य हे काही पक्ष्यांचे खाद्य असते. त्यामुळे काही पक्षी हे कीड नियंत्रणास मदत करतात, तर काही पक्ष्यांमुळे पिकांचे नुकसान होते. शेती आणि पर्यावरण यांना साहाय्यभूत ठरणार्या पक्ष्यांबद्दलची माहिती प्रस्तुत लेखातून देण्यात आलेली आहे.
पक्षी आणि पर्यावरण
“सामान्यपणे मानवास व शेतीस हानिकारक असणार्या कीटकांचा समावेश पक्ष्यांच्या अन्नामध्ये होतो. अनेक प्रजातींचे पक्षी फक्त कीटकच खात नाहीत, तर त्यांची अंडीही मोठ्या प्रमाणावर फस्त करून टाकतात. त्यामुळे वेगवेगळ्या अवस्थेतील कीटक उदा. अंडी, अळी, कोष, पूर्ण कीटक हे पक्ष्यांकडून खाल्ले जातात, त्यामुळे कीटकांची संख्या नियंत्रित राखण्यास मदत होते...
आजच्या बिहार राज्यातील पुसा येथील ‘अॅग्रिकल्चर रीसर्च इन्स्टिट्यूट’मधील सी. डब्ल्यू. मॅसन आणि एच. मॅक्सवेल लेफ्रॉय या कीटकशास्त्रज्ञांनी ‘भारतातील पक्ष्यांचे अन्न’ या विषयावर विसाव्या शतकाच्या प्रारंभी संशोधन केले. त्यात त्यांना असे आढळून आले की; शेतातील पिकांवर येणारे अनेक पक्षी असे आहेत की, ज्यांचे खाद्य प्राधान्याने पिकांवरील कीड आणि कीटक हे आहे; तर शेतामधील उत्पादित धान्य हे काही पक्ष्यांचे खाद्य असते. त्यामुळे काही पक्षी हे कीड नियंत्रणास मदत करतात, तर काही पक्ष्यांमुळे पिकांचे नुकसान होते. शेती आणि पर्यावरण यांना साहाय्यभूत ठरणार्या पक्ष्यांबद्दलची माहिती प्रस्तुत लेखातून देण्यात आलेली आहे.
उपद्रवी किडीचे व कीटकांचे निर्मूलन करणारे पक्षी
कीटकांची विविधता़, त्यांची संख्या व अधाशीपणे खाण्याची सवय हे सर्व अविश्वसनीय आहे. भारतीय उपखंडात जवळपास तीस हजार प्रकारचे कीटक असल्याची नोंद आढळते. या सर्व कीटकांना अन्न पुरवण्याचे काम वनस्पती व प्राणी यांच्याकडून होते. कीटकांची संख्या मर्यादित राहिली नाही, तर शेतीबरोबरच कोणत्याही प्रकारच्या वनस्पती जिवंत राहणार नाहीत. प्रत्येक सजीव मग तो प्राणी असो वा वनस्पती; त्याला अन्नासाठी स्पर्धा ही करावीच लागते. अनेक कीटक (अळ्या) दिवसातून दोन वेळा त्यांच्या वजनाइतकेच अन्न ग्रहण करतात. कोवळी पाने खाणार्या अळ्या 24 तासांत त्यांच्या वजनाच्या दोनशे पट अन्न खातात. टोळ ज्याप्रमाणे त्यांच्या खाण्याच्या असाधारणपणासाठी प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे ते मुबलक प्रजोत्पादनासाठीही प्रसिद्ध आहेत. त्यांचा गट कधीकधी इतका मोठा असतो की, तो काही तासांतच एका बहारदार झाडाचेे रूपांतर निरुपयोगी अशा रिकाम्या खोडामध्ये करतो. मादी टोळ जमिनीमध्ये एका कोषात साधारणपणे १०० अंडी घालते, तर एक मादी असे अनेक कोष तयार करते. दक्षिण आफ्रिकेतील शेतात एका वेळी १ हजार ३३५ हेक्टर क्षेत्रातून चौदा टन अंडी खोदण्यात आली होती, ज्यांच्यापासून अंदाजे एक हजार दोनशे पन्नास दशलक्ष इतकी टोळांची संख्या वाढली असती.
कीटकांचे हे वाढते प्रमाण आणि अन्नरूपात वनस्पतीभक्षण करण्याची त्यांची क्षमता लक्षात घेता, कीटकांची संख्या एका विशिष्ट/ठरावीक प्रमाणात नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे आणि पक्ष्यांमार्फत हे काम निसर्गतः केले जाते. सामान्यपणे वनस्पतींसाठी, विशेषतः शेतातील पिकांसाठी आणि विविध प्राण्यांसाठी उपद्रवी ठरणार्या कीटकांचा समावेश पक्ष्यांच्या अन्नामध्ये होतो. त्यामुळे अनेक प्रजातींचे पक्षी फक्त कीटकांनाच खात नाहीत, तर त्यांची अंडीही मोठ्या प्रमाणावर फस्त करतात. त्यामुळे वेगवेगळ्या अवस्थेतील कीटक उदा. अंडी, अळी, कोष, पूर्ण कीटक पक्ष्यांकडून खाल्ले जातात. त्यामुळे कीटकांची संख्या नियंत्रित राखण्यास मदत होते. दरवर्षी हिवाळ्यामध्ये कीटकांची एक नवी पिढी तयार होत असते. भोरड्या आणि मैना हे पक्षी याच ऋतूमध्ये हिमालयातून लाखोंच्या संख्येने देशातील वेगवेगळ्या भागांत येतात आणि ज्वारी व बाजरी यांसारख्या पिकांना घातक ठरणार्या कीटकांच्या टोळ्या आणि अळ्या खाऊन किडींपासून होणारे पिकांचे नुकसान रोखून धरतात. किडींपासून पिकांचे संरक्षण करणार्या पक्ष्यांमध्ये कावळे, नीलकंठ यांसारख्या पक्ष्यांचाही समावेश होतो. शेतीसाठी घातक असणारे कीटक, गवतातील बिया इत्यादींपासून संरक्षण करण्याचे काम प्रौढ फिंचेस व सुगरण (Finches & Weavers), चंडोल (larks), चिमण्या (Pipits) आणि वटवटे (Warblers) या जातींचे पक्षी करतात. प्रौढ फिंचेस व सुगरण या जातींचे पक्षी पिकांवरील अळ्या आणि अंडी त्यांच्या पिल्लांना भरवतात, तसेच शेतातील गवतांच्या बिया खाऊन ते तणांचा वाढता प्रसार थांबवतात. अशा प्रकारच्या पक्ष्यांचे प्रमाण आपल्या परिसरातील गवताळ भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
पाकोळ्या (Swifts and Swallow) प्रवर्गातील पक्षीही गव्हावरील कीडनियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावतात. हिवाळ्यात आणि मध्य उन्हाळ्यात पिकांवर ज्या किडींचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव होतो, त्यांवर हे पक्षी उदरनिर्वाह करतात. गमतीशीर बाब म्हणजे वटवटे (Warblers) जातीचे पक्षी ऊस पिकातील कीटक खात असताना आपणांस पाहायला मिळतात. बुश चॅट, खाटीक, कोतवाल, वेडा राघू हे पक्षी पिकांभोवती दिवसा वेगवेगळ्या कीटकांना खाताना आढळतात. पांढरा करकोचा, शराटी यांसारखे पक्षी जमिनीतील वेगवेगळे कीटक पायाने उकरून खात असतात.
पक्ष्यांच्या अन्नातील कीटकांचे प्रमाण पाहिल्यास असे लक्षात येते की, भोरड्यांची एक जोडी २४ तासांत ३७० वेळा घरट्याकडे अन्न घेऊन येते. त्यामध्ये अळी, टोळ, नाकतोडे असे विविध कीटक असतात. भोरड्यांकडून घरट्यात आणल्या जाणार्या अन्नाचे वजन त्या-त्या भोरड्याच्या वजनाइतके असते असे निरीक्षणावरून लक्षात आले आहे. सुप्रसिद्ध ब्रिटिश पक्षितज्ज्ञ डॉ. डब्ल्यू. ई. कोलिंग (Dr. W. E. Collinge) यांच्या मतानुसार, एक चिमणी एका दिवसात २२० ते २६० वेळा आपल्या घरट्यात अन्न घेऊन येते; ज्यामध्ये वेगवेगळ्या अळ्यांचा व इतर कीटकांचा समावेश असतो. एका जर्मन पक्षितज्ज्ञाने अंदाज मांडलेला आहे की, ‘टोपीवाला’ या पक्ष्याची एक जोडी तिच्या पिल्लासह एका वर्षात कमीतकमी १२० दशलक्ष कीटकांची अंडी किंवा १ लाख ५० हजार अळ्या आणि कोष नष्ट करते. यावरून असे लक्षात येते की; कीटकांच्या वाढीवर व कीटकांमुळे होणार्या उपद्रवावर नियंत्रण ठेवण्यासाठी, मोठ्या प्रमाणात नैसर्गिकरीत्या पक्ष्यांची मदत होते. निसर्गातील अन्नसाखळीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.