पण त्यांना एकही झाड दिसेना. आता त्यांना चालवेना. पाय थकले. घामाच्या धारा वाहत होत्या. ऊन रणरणत । होते. तळहाताएवढीसुद्धा सावली दिसेना. तहानेने घसा कोरडा पडला. कोठे पाणी मिळेना. विहिरी, तलाव आटले. ओढे, नद्या कोरड्या पडल्या. एकेक माणूस बेशुद्ध पडू लागला. तेव्हा सगळी माणसे हादरली. हात जोडून देवाची प्रार्थना करू लागली. इतक्यात वृक्षदेवता प्रकट झाली. माणसांनी कु-हाडी टाकल्या. देवीसमोर लोटांगण घातले.
वृक्षदेवता माणसांना म्हणाली, "कळली का तुमची चूक? आता यापुढे लक्षात ठेवा, झाडांनासुदधा प्राण असतो. त्यांनासुद्धा भावना असतात. झाडांप्रमाणेच, प्राण्यांनासुद्धा भावना असतात. वनस्पतींना, प्राण्यांना बोलता येत नाही. म्हणून ते आपले दुःख सांगू शकत नाहीत. त्यामुळे तुम्हांला वाटते की, त्यांना दुःख होतच नाही. "तेव्हा, झाडे तोडणार नाही; प्राण्यांना मारणार नाही; अनाथ-अपंगांना व म्हाताऱ्या माणसांना दुःख देणार नाही, असे मला वचन द्या. तरच मी तम्हांला मदत करीन."
माणसांनी ताबडतोब देवीला तसे वचन दिले. तेव्हा, देवी अदृश्य झाली आणि सगळीकडे हिरवीगार झाडे
दिसू लागली.
Answers
Answer:

hope it's helpful for you
plz mark me brain list