Pani adva Pani jirva vaichaarik lekhan in Marathi
Answers
Answer:
पाणी अडवा, पाणी जिरवा, जीवनाची वणवण थांबविण्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात प्रत्येकाने पाच फूट लांब, तीन फूट रुंद व दोन फूट खोल मापाचा किमान एक तरी खड्डा खणून त्यातून पाणी जमिनीत जिरवण्याचा प्रयत्न करण्याची गरज, सेवानिवृत्त शिक्षक, संगणक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य गिरीधर विश्वनाथ परांजपे यांनी शासनासमोर ठेवली आहे. पाण्यासाठी दाहीदिशा किंवा दुष्काळ परिस्थिती पाहून प्रा. गिरिधर परांजपे यांनी पाणी अडवा, पाणी जिरवाचा एक प्रस्ताव बनविला. हा प्रस्ताव मुख्यमंत्री, मंत्री व राज्याच्या प्रधान सचिवांना देऊन पाण्यासाठी प्रतिज्ञा करावी, तसेच राज्यातील शाळांच्या माध्यमातून प्रकल्प राबवावा असे म्हटले आहे. वाढते प्रदूषण, हवाई हल्ले, तेल जहाजांना लागणाऱ्या आगी, जंगलातील वणवे, ब्रह्मांडाचा शोध घेणारे प्रयोग, त्यातून निर्माण होणारे ग्लोबल वॉर्मिग, पर्यावरण असंतुलन, जंगलतोड, पृथ्वीच्या पोटातील कैक किलोमीटर खोलवर जाणाऱ्या कोळसा व इतर खनिजांच्या खाणी या रूपाने पृथ्वीवर अत्याचार होत आहे. त्यात भर म्हणून आणखीन एक अत्याचार नलिका कूप विहीर (बोअरवेल)च्या रूपाने डोके वर काढत आहे. प्रत्येकजण वैयक्तिक स्वार्थासाठी आपापल्या जागेत बोअरिंग विहिरी मारतात. त्यामुळे पृथ्वीच्या पोटातील पाण्याची पातळी खूपच खालावली आहे. सध्या तर पाचशे फूटांपासून एक हजार फूटापर्यंत बोअरिंग मारली जातात म्हणजे एक प्रकारे पृथ्वीच्या पोटात हजारो इंजेक्शने देऊन अत्याचार करून पाण्याचा प्रचंड प्रमाणात उपसा सुरू आहे असे प्रा. परांजपे म्हणतात. या साऱ्या प्रकारामुळे पाण्याची पातळी खाली जाते, तसेच विहिरीतील झरे मार्ग बदलतात, एवढेच नव्हे तर त्यामुळे पृथ्वीच्या पोटातील थंडाई कमीकमी होत आहे. त्याचा परिणाम पृथ्वीवरील हवामान, ऋतू, वातावरण बदलत आहेत. अवेळी पाऊस, गारपीट, थंडी, वादळी वारे, धुळीची वादळे, महापूर यांसारख्या अनियमित गोष्टी सातत्याने घडत आहेत. बोअरिंग विहिरीमुळे विहिरींचे झरे आटत असून पाण्याचे मार्गदेखील बदलतात. पाण्याचे विदारक चित्र उभे राहिले आहे. १५० ते २०० इंच पाऊस पडूनही पाणी दुर्भिक्ष दिसते. त्यामुळे पाणी अडवा, पाणी मुरवा योजना हाती घेणे गरजेचे आहे असे प्रा. परांजपे यांनी म्हटले आहे. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, ग्रामपंचायत, ग्रामविकास मंडळे, सामाजिक संस्था, सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग, रेल्वे, एस.टी. यासह पर्वत रांगा, डोंगर, टेकडय़ा, ओसाड प्रदेश यासारख्या ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या त्या ठिकाणी पाच फूट लांब, दोन फूट रुंद व दोन फूट खोल मापाचे खड्डे, चर खणून त्यात पाणी अडवून ते पाणी जमिनीत जिरविणे हाच एकमेव मार्ग आहे. नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय मोहीम म्हणून हा पर्याय निवडला जावा असे प्रा. परांजपे म्हणाले.
Answer:
पाणी हे निसर्गाने दिलेले अमूल्य असे स्तोत्र आहे , पाणीच जर नसेल तर.... हि कल्पना सुद्धा अंगावर शहारे आणून सोडते . सकाळपासून तर रात्रीपर्यंत पाण्याचा प्रत्येक कार्यात उपयोग होतो. विशेषतः पाणी पिण्यासाठी वापरले जाते. पृथ्वीचा ७०% भाग पाण्याने व्यापला आहे . परंतु तरीही आज पाण्याची टंचाई सर्वदूर जाणवत आहे. मोठ्या प्रमाणात होणारे व्यापारीकरण , शहरीकरण यामुळे पाण्याच्या साठवणुकीला तडा जात आहे. रस्ते बांधकामासाठी नदी नाल्यांची दिशा बद्दलि जात आहे. त्यामुळे सर्वदूर पाण्यासाठी वणवण होत आहे, म्हणूनच सर्व नागरिकांनी आपल्या दैनंदिन जिवनात पाण्याचा वापर सांभाळून करावा . घरातील सांडपाणी शेतात सोडावे, वॉटर हार्वेस्टिंग ची सुविधा करावी, जास्तीत जास्त पाणी जमिनीत कसे मुरवता येईल याचा अभ्यास करावा. लोकसहभागातून शेतात बंधारे तयार करावेत , कारण "जल है तो कल है!" म्हणूनच "पाणी आडवा ,पाणी जिरवा. "
I hope you can help