History, asked by kumaradarsh5064, 1 year ago

Pani bachat kalachi garaj essy in Marathi 500 words

Answers

Answered by AadilAhluwalia
10

पाणी बचत काळाची गरज

जल हे जीवन ही म्हण आपण लहानपणा पासून ऐकत आलो आहोत. अर्थातच पाणी हेच आयुष्य आहे. पाण्याविना जीवन शक्य नाही. माणसाचे शरीर ७०% पाण्याने बनले आहे. पाणी हे मनुष्याची मूलभूत गरज आहे. मनुष्यच नव्हे तर पशु, पक्षी, झाडे, झुडपे अगदी सूक्ष्म जीव सुद्धा पाण्याशिवाय जगू शकत नाही. मासे तर पाण्यात आपले अवघे आयुष्य घालवतात. पाण्यामुळेच तर पृथ्वी समृद्ध आहे. पावसामुळेच तर भूमी हिरवा शालू नेसल्याप्रमाणे सुंदर वाटते.

पाणी आपल्यासाठी इतके महत्वाचे आहे , तरी आपण काय करतो? परतफेड तर दूर राहिले पण आपण साधं पाणी वाचवू पण नाही शकत. पाण्याची कितीशी नासाडी केली असेल आपण! पाण्याचा वापर योग्य रित्या करणे आपले काम आहे.

आजच्या युगात पाण्याची कमतरता आहे. पिण्याचं पाणी काही ठिकाणी बायका मैलो चालत जाऊन भारतात. विदर्भ आणि मराठवाडा पाण्याविना सुका पडलाय. पिकांना द्यायला सुद्धा पाणी उरलं नाही. जमिनीतही पाण्याचा साठा दिवसंदिवस कमी होत चालला आहे. दुष्काळाचे प्रमाण वाढत चालले आहे. लोक पाण्याच्या एक एक थेंबसाठी व्याकुळ झालेले असतात. काही गावांत तर आठवड्यातून १ किंवा २ दिवसच पाणी मिळते.

नदी आणि तलाव प्रदूषित झाले आहेत. कंपनीचे अशुद्ध पाणी, धुणी- भांडी केलेले खराब पाणी, गुरांना नदीत धुत्यामुळे खूप पाणी प्रदूषित झाले आहे. तेलासाठी समुद्रात सोडलेले जहाज सुद्धा समुद्री जीवनासाठी धोका आहे.

एवढेच नव्हे तर निर्माल्य पाण्यात टाकल्यावर सुद्धा पाण्यातील जीवांना धोका असतो. ह्या सर्व गोष्टींमुळे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही.

सूर्याचं तापमान वाढत चाललं आहे. त्यामुळे पृथ्वीचा ही पारा वर जात आहे. वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळत चाललं आहे. समुद्राचा पातळीत चढ होत आहे. तसं पाहिलं तर भरपूर पाणी आहे. पण अशा पाण्याचा काय उपयोग? असं पाणी कुठल्याच कामासाठी वापरणं शक्य नाही. जशी जनसंख्या वाढेल तशी पाण्याची गरजही वाढेल.

पाण्याची बचत खूप महत्त्वाची आहे. पाणी वाया जाऊ नये म्हणून आपण योग्य ती काळजी केली पाहिजे. गरज नसेल तेव्हा नळ बंद करणे, गळत असलेला नळ दुरुस्त करणे ह्या छोट्या छोट्या गोष्टी पळून आपण पाणी वाचाव्याकरिता आपले योगदान देऊ शकतो.

शासनाकडून अनेक योजना रुजविण्यात आल्या आहेत. त्या योजनेमध्ये सहयोग देऊन आपण पाण्याची बचत करण्यात आपणे योगदान करू शकतो. शासनाबरोबर खासगी संघ हे काम चोख रित्या करत आहेत. पानी फाउंडेशन हे अभिनेता आमिर खानने सुरु केलेली एक चळवळ अवघा महाराष्ट्रात पसरली आहे. अनेक लोक त्यात श्रमदान करून पाणी वाचावा म्हणून प्रयत्न करत आहेत. याचप्रमाणे नाम फाउंडेशन (नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे) पाणी वाचवण्याची खटपट करत आहेत.

पाण्याची बचत खरंच खूप महत्त्वाची आहे कारण जल आहे तर भविष्य आहे.

Similar questions