English, asked by shawmadhu96, 11 months ago

Pani hi Jivan nibandh in Marathi 15 lines

Answers

Answered by jyothikareddy1234
1

Answer:

पाणी आपले जीवन. पाण्याशिवाय जीवन नाही. हे खरे आहे पण आपण ह्या जीवनाचा आदर राखतो का ? देशातील जे पाण्याचे स्तोत्र आहेत ते दुषित होत चालले आहेत. आपण आपल्या हाताने पाण्याचे हे स्तोत्र नष्ट करत आहोत का ? पुढील पिढ्यांसाठी आपण ह्या प्रदूषित नद्या, दुषित पाण्यामुळे होणारे रोग हा वारसा ठेवून जाणार आहोत का याचा प्रत्येक सुज्ञ माणसाने विचार करायला हवा.

अनिर्बंध वाळू उपसा, नद्यांच्या पात्रात अडथळा करणे ह्याने आपण आपल्या निसर्गाची अवहेलनाच करत आहोत. देशातील जवळ जवळ दोन तृतीयांश नद्या ह्या कोरड्या पडल्या आहेत तर बाकीच्या प्रदूषित झाल्या आहेत . शेती साठी लागणारी जमीन आहे पण प्रदूषित पाण्यामुळे पीकही घेवू शकत नाही अशी आपल्या इथल्या शेतकर्याची अवस्था आहे. पाण्याचे नीट नियोजन न केल्याने दुष्काळ हा देशाच्या पाचवीला पुजलेलाच आहे.

आणि जो पाणीसाठा शिल्लक आहे त्यात कारखान्यांमधून होणारे प्रदूषण, नदीकिनारी केली जाणारी धार्मिक कृत्ये, नदीत मोठ्या प्रमाणावर टाकला जाणारा कचरा ,वसाहतीतून सोडण्यात येणारे सांडपाणी, गंगेत काही ठिकाणी प्रेत सुद्धा सोडले जाते. हे करून आपण निसर्गाला नष्ट करण्यात हातभारच लावत आहोत जलचरांच्या दुर्मिळ जाती नष्ट करत आहोत नि निसर्गाचा विध्वंस करत आहोत. नद्यांना वाहते ठेवल्यास देशात आपण हरित क्रांती घडवू शकतो. नद्यांचे मोठ्याप्रमाणात होणारे प्रदूषण रोखून आपण निसर्ग वाचवण्यात आपला खारीचा वाट उचलू शकतो.

महाराष्ट्रात नाशिकला कुंभमेळा भरतो करोडो लोक तेथे स्नान करून पावन होतात. परंतु गोदावरी नदी हि अत्यंत प्रदूषित झालेली आहे. मेगासेसे पुरस्कार विजेते जलतज्ञ राजेंद्र सिंह ह्यांनी ‘कुंभ मेळ्यात मुख्यमंत्र्यांनीच आधी स्नान करून आचमन करून दाखवावे असा उपरोधिक टोला लावला आहे.’ ह्या वरून बोध घेवून सरकारने नद्या प्रदूषित होवू नये म्हणून पावले उचलणे गरजेचे वाटते.

Explanation:

Answered by ailom04
0

Answer:

पाणी म्हणजे जीवन आहे।पाण्याची गरज सगळ्यांना लागते।पशु पक्षी व मानव हे वण्याशिवाय जगू शकत नाही

Similar questions