Pani vachava in marathi
Answers
Answer:
पृथ्वी हा एक असा ग्रह आहे जानवर मानवाला आपले जीवन जगण्यासाठी विविध संसाधने उपलब्ध आहेत. तसेच इतर कोणत्याही ग्रहांवर जीवन शक्य नाही. कारण ते नापीक वाळवंटाप्रमाणे आहेत आणि तिथे पाणी मिळत नाही.
पाण्याशिवाय कोणताही व्यक्ती आपल्या जीवनाची कल्पना करु शकत नाही. कारण मानवाचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून आहे. पाणी हे जीवनातील सर्वात महत्वाचे अनमोल रत्न आहे.
पाणी हे मानवाला निसर्गाकडून मिळालेली एक अनमोल भेटवस्तू आहे. मानव काही दिवस अन्ना शिवाय राहू शकतो. परंतु मानव आपले जीवन पाण्याशिवाय जगू शकत नाही. पाण्याचा एक – एक थेंब महत्वाचा आहे. म्हणून म्हटले गेले आहे कि, पाणी हेच जीवन आहे.
पाण्याची बचत म्हणजे –
पाण्याची बचत म्हणजे कोणत्याही प्रकारे पाणी वाचवणे. पृथ्वीचा ७१ % भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. या धरतीवर १% पाणी हे पिण्यायोग्य आहे. तरीपण काही लोक हे पाणी वाया घालवतात. परंतु आपल्या सर्वाना जास्तीत – जास्त पाण्याची बचत केली पाहिजे.
खार पाणी आणि गोड पाणी
आपल्या धरतीवर दोन प्रकारचे पाणी उपलब्ध आहे. ते म्हणजे एक खार पाणी आणि दुसरं म्हणजे गोड पाणी. मानव गोड पाण्याच्या उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. तसेच खाऱ्या पाण्याच्या उपयोग जास्त प्रमाणात केला जात नाही.
पाण्याचा उपयोग
मानव स्वच्छ आणि गोड पाण्याचा उपयोग जेवण बनवण्यासाठी, कपडे आणि भांडी धुण्यासाठी तसेच साफ – सफाई करण्यासाठी करतो. हि सर्व कामे करत असताना मानव पाणी जास्त प्रमाणात वाया घालवतो. तसेच मानव पाण्याचा उपयोग आग विझवण्यासाठी आणि होळी हा सण खेळण्यासाठी करतो.
Explanation:
hope it will be helpful to you
and plz follow me