English, asked by ashishaswar45, 2 months ago

panpoiche महत्त्व 50 ते 60 शब्दांत लिहा​

Answers

Answered by abhi8190
2

Answer:

pls mark me brainlist

Explanation:

जल ' ही जीवन है। असे असतांना पाण्याचे महत्व जाणून घेऊन पाण्याचा वापर काटेकोरपणे करणे अपेक्षित आहे.अजूनही भारतीयांना पाण्याचे महत्व कळलेले नाही.पाण्याचा वापर कसा करावा,पाणी कसे जपून वापरावे, पाण्याचे शुध्दीकरण कसे करावे याची इस्तंभूत माहिती शिक्षणातूनच करून देण्यात यावी. ' पाणपोई ' म्हणजे शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.ऊन्हाळ्याच्या दिवसात ऊन्हातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तहान भागविण्यासाठी कोणतेही शुल्क न आकारता पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे सामाजिक जाणीव जीवंत असल्याचे लक्षण आहे.

' पाणपोई ' ही संकल्पना चांगली असून हा एक सामाजिक उपक्रम आहे. तहानलेल्या वाटसरूंना पाणी पाजणे हे एक सामाजिक काम आहे.काही काळ आधी पाणी विकणे हा एक सामाजिक अपराध समजला जात असे.आज पाणी विकणे हा व्यवसाय झालेला असून याला सरकार मान्यता प्राप्त झालेली आहे.

पैसा खर्च करून पाणी विकत घेणे समाजमान्य झालेले आहे. शुद्ध आरोचे पाणी पिणे ही फॅशन झाली असल्याने पाणपोई चे पाणी पिणे कमीपणाचे लक्षण समजण्यात येते आहे. बाटली बंद पाण्याची, पाॅऊचची सवय लागल्याने फारच कमी प्रवासी ' पाणपोई ' चा वापर करतांना आढळून येतात. काही जैन संघटनांनी, इतर समाजभान जपणाऱ्या संस्थानी आणि बस स्थानकांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे.काही सार्वजनिक पाणी पिण्याच्या ठिकाणी अस्वच्छतेचा वावर असल्याने बहुतांश प्रवाशी हे विकतच्या पाण्याचाच वापर करतांना आढळून येतात. तर काही खाद्य पदार्थ विकणारी उपहारगृहे ही खाद्य पदार्थांची खरेदी केली तरच पिण्याचे पाणी पुरवितात असे निदर्शनास आलेले आहे.आजच्या काळात सामाजिक मूल्ये ही बदलत चाललेली असल्याने ' पाणपोई ' चे महत्व कमी होत आहे.तरी सुध्दा काही संस्था सामाजिक जाणिवेतून ' पाणपोई ' ची व्यवस्था करीत असतील तर ती बाब अजूनही भुषणावह ठरते आहे

Similar questions