India Languages, asked by jishabhRishabh6728, 5 months ago

Panyachi bachat essay in marathi

Answers

Answered by sarojsandip143
2

Answer:

पाणी हे जीवन आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पृथ्वीची निर्मिती पाण्यापासून झाली आहे असं म्हटलं जातं. जनजीवन सुरळीत सुरू राहण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचं असूनही पाण्याची बचत करण्याकडे लोकांचा कल कमी प्रमाणात असतो. ज्यामुळे भविष्यात पाणी संकट निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. आजकाल पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतो. ज्यासाठी विविध माध्यमातून सरकार पाणी वाचवण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहचवत असते. मात्र पाणी वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले गेले पाहिजेत. शिवाय यासाठी प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या घरात आणि वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केल्यास भविष्यातील पाणीटंचाईचा धोका नक्कीच टाळता येऊ शकतो. यासाठी पाणी बचत उपाय नक्की काय आहेत हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. त्यासोबच घरातील प्रत्येकाला पाण्याचे महत्त्व पटवून दिले पाहीजे

Explanation:

hope youlike the answer please mark me as a brainless my all friends are are on brainly they are teasing me because I'm I am not a brain list please please please

Similar questions