पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणजे काय
Answers
Answered by
2
Answer:
पर्वताच्या वातविमुख बाजूस वृष्टीचे प्रमाण ठळकपणे कमी आढळते. अशा प्रदेशास पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतात. प्रतिरोध प्रकारच्या वृष्टिमध्येच ही गोष्ट आढळून येते. त्यात उंचसखल भूपृष्ठरचना हेच वृष्टीचे प्रमुख कारण असते. उबदार सागराकडून वारे भूपृष्ठाकडे वाहू लागतात, तेव्हा ते बाष्पभारित असतात. अशी हवा पर्वताच्या पायथ्याशी साचते व भूपृष्ठरचनेनुसार पर्वताच्या वाताभिमुख बाजूस वर चढू लागते, तेव्हा उंचीनुसार तिचे तपमान कमी होत जाते व सांद्रीभवनात वाढ होते. यामुळे वाताभिमुख बाजूस भरपूर वृष्टी होऊन हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते.
Answered by
2
Answer:
अशा प्रदेशास पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतात. प्रतिरोध प्रकारच्या वृष्टिमध्येच ही
Similar questions