परीक्षा बंद झाला तर..... निबंध मराठी
Answers
नुसता विचारही किती सुखावह आहे.. “परीक्षा नसत्या तर??”. शालेय जिवनात विद्यार्थी कित्तेक परीक्षांना सामोरे जात असतो. चाचणी परीक्षा, सहामही परीक्षा, वार्षीक परीक्षा ह्या तर नेहमीच्या झाल्याच पण त्याचबरोबर तोंडी परीक्षा, पाठांतर परीक्षा, विज्ञान प्रयोगाच्या परीक्षा, हस्तव्यवसाय, चित्रकला, पि.टी. एक ना दोन असंख्य परीक्षांचा भडीमार चालु असतो वर्षभर. शिकतो म्हणुन परीक्षा असतात का परीक्षा आहेत म्हणुन शिकतो असा प्रश्न मनामध्ये तरळुन जातो.
परीक्षांचे वेळापत्रक लागले आणि जसजसे परीक्षांचे दिवस जवळ यायला लागले की सारं वातावरणच बदलुन जाते. विषेशतः वार्षीक परीक्षा. घरातला दुरदर्शन बघणे तसेही अशक्यच असते, ह्या काळात तर तो दुरदर्शनचा आवाजही ऐकु येत नाही. खेळाची मैदाने ओस पडलेली असतात. बाहेर पानगळतीचा हृतु चालु झालेला असतो. कोपऱ्या कोपऱ्यावर उसाची गुऱ्हाळ असतात. शाळेत वाचनलयातुन एखादे पुस्तक आणावे म्हणुन चक्कर मारावी तर शाळाही ओसच असतात. एखादा दुसरा मित्र भेटतो पण त्याच्याही चेहऱ्यावर परीक्षांचे ओझे दिसत असतेच.
अश्या ह्या परीक्षाच बंद झाल्या तर कित्ती मज्जा येईल. सगळीकडे आनंदी आनंद पसरेल. परीक्षांच्या चिंता नाहीत, वेळापत्रकांचे ओझे नाही, अभ्यासाची कटकट नाही. परीक्षा नाहीत तर गुण नाहीत, टक्केवारी नाही, पास/नापास व्हायची चिंता नाही. कुणी ‘हुशार’ कुणी ‘ढ’ असा भेदभावच होणार नाही. शालेय जिवनाची सर्व संकृतीच बदलुन जाईल.
पण.. परीक्षा नाही झाल्या, सगळेच पास झाले तर खऱ्या गुणवत्तेचा कस कसा लागणार? शाळा-कॉलेजातुन बाहेर पडल्यावर जेंव्हा आपण आयुष्यातील खऱ्या परीक्षेला सामोरे जाऊ तेंव्हा आपले हात-पाय थरथरायला लागतील कारण त्यावेळेस परीक्षांना सामोरे जायला आपण तयार नसु. परीक्षा नसेल तर आपण मिळवलेले ज्ञान आणि त्याचा समजलेला अर्थ हा चुक का बरोबर हे कसे समजणार? भारत देश्याला ‘विकसनशील’ देशापासुन ‘विकसीत’ देश अशी ओळख करुन घ्यायला गरज आहे खऱ्या गुणवंतांची. अश्या लोकांची जे लोक वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवतील, भारत देश्याचे नाव जगाच्या नकाश्यावर ठळक करतील. परीक्षाच नाही झाल्या तर कदाचीत खरी गुणवत्ता झाकोळली जाईल. नाकर्त्या लोकांची नोकर्य़ांमध्ये भरती झाली तर त्या कंपनीची स्थीती खालावेलच पण अनुषंगाने भारत देशाची सुध्दा प्रगतीच्या मार्गावरील घौडदौड मंद होईल.
परीक्षाच नाही म्हणलं तर, शिक्षणाचे अंतीम ध्येयच नसले तर कश्याला कोण शिकेल आणि कश्याला कोण ज्ञानार्थी होईल?
परीक्षा हव्यातच. परीक्षा व्यक्तीला त्याची विद्या आणि त्याची बुध्दी अधीक तल्लख करायला भाग पाडतात. परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांना अधीकाअधीक ज्ञान मिळवण्यासाठी आणि मिळवलेले ज्ञान पुन्हा-पुन्हा पडताळुन पाहण्यासाठी भाग पाडतात. परीक्षा मनुष्याला आयुष्यात येणा़ऱ्या संकटांना सामोरे जाण्याचे बळ देतात.
त्यामुळे परीक्षा नसत्या तर हा विचार सुखावह असला तरी त्याचे परीणाम भावी आयुष्यात नक्कीच सुखावह नसतील.
Hope it will help you
please marks me
Answer:
आपल्या शिक्षणपद्धतीतून परीक्षा कायमस्वरूपी संपुष्टात आल्यास हे जग किती छान आणि आनंददायी असेल.
परीक्षा हा शब्द नेहमीच भीती, तणाव, अस्वस्थता आणि थंड घाम आणतो. हे आपल्याला थरथर कापायला लावते. पण तरीही आम्ही मोठ्या जिद्दीने परीक्षेला सामोरे जातो आणि उडत्या रंगांसह बाहेर पडतो.जर परीक्षा रद्द केली गेली तर मी शुद्ध आनंदात असेन. माझ्यासाठी, गणित हा एक विषय आहे जो मला निद्रानाश रात्र देतो आणि भूगोलने मला जगभरात नेहमीच प्रेरणा दिली आहे.
इंग्रजी वर्तमान, भूतकाळ आणि भविष्य मला नेहमीच गोंधळात टाकतात आणि रसायनशास्त्राची समीकरणे मला चुकीची सिद्ध करतात. जीवशास्त्रातील आकृत्या हेच माझ्या मानेचे दुखणे आहे आणि मराठी आणि हिंदीतील विविध लेखकांनी मला वेड लावले आहे.मला इतिहासातील सम्राट आणि योद्धांबद्दल विचारू नका कारण ते सहसा माझ्या स्वप्नात दिसतात - आणि मला घाबरण्याशिवाय काहीही देत नाहीत. मला आशा आहे की तो दिवस लवकरच येईल जेव्हा आपल्या सर्वांकडे एक तुकडा असेल.
अनेक वेळा असे दिसते की शाळा-कॉलेजांतील परीक्षांचा आपल्या व्यावहारिक जीवनात फारसा संबंध नाही.
एखाद्या व्यक्तीकडे असलेली पदवी वर्षानुवर्षे भिंतीवर टांगली गेल्याशिवाय त्याला किंमत नसते. भारतात सर्वत्र लाखो विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षित आणि प्रशिक्षित केले जाते.
परीक्षेच्या काळात फसवणूक झाल्याच्या अनेक घटना आपण वाचतो, त्यापैकी अनेकांना रंगेहाथ पकडले गेले होते, पण जे विद्यार्थी फसवणूकीपासून मुक्त राहिले आहेत त्यांचे काय?असे विद्यार्थी केवळ उडत्या रंगानेच बाहेर पडत नाहीत तर त्यासाठी पात्र असलेल्या मेहनती विद्यार्थ्यांपेक्षा त्यांना चांगली नोकरीही मिळते.
पण परीक्षा नसती तर आपला मेंदू अर्धवट काम करायचा थांबला असता आणि वाचन, लेखन, प्रश्न सोडवणे अशा कोणत्याही कामासाठी त्याचा उपयोग होत नाही. भविष्यात, आपल्याला फालतू मूर्खांशिवाय काहीही म्हटले जाणार नाही.
#SPJ2