India Languages, asked by tanvipawar2811, 2 months ago

परीक्षा हवी का नको निबंध​ in marathi

Answers

Answered by Aditya20824
0

आम्हा मुलांची खरोखर किती मजा असते ! सकाळी उठावे नियमित कामे उरकून शाळेत यावे. संध्याकाळी खूप-खूप खेळावे रात्री आरामशीर झोपावे. पण ह्या सगळ्या मजेची नासाडी करणारी एक गोष्ट मधून-मधून आम्हा मुलांवर डोळे बटारीत असते, अहो कोण असणार ती ? परीक्षाच.

नियमित काम चालल असतांना अचानक हेडमास्तरांची नोटीस विजे प्रमाणे कोसळते. दिनांक अमुक-अमुक पासून ते अमुक तारिक पर्यंत परीक्षा सुरु, आपल्या शाळेची परीक्षा होणार आहे तरी सर्व विद्यार्थी परीक्षेस बसून चांगळ्या गुणांनणी पास होण्याच्या प्रयत्न करावा. एखादे सुंदर असे स्वप्न बगत असतांना आपल्याला कोणी येऊन झोपेतून उठवते तर किती राग येतो, पण आपण करणार काय?

हेडमास्तरांन कडून आलेल्या ह्या सूचनेचा मोठा परिणाम होतो. सगळा दिनक्रमच बदलून जातो, परीक्षेची तारीख सारखी-सारखी डोळ्यापुढे नाचू लागते. मग मी काळजीपूर्वक गुरुजींच्या वर्गातील शिकवण्या कडे लक्ष देऊ लागतो खोड्या करणे ओपआप बंद होतात. सर्व विषय डोळ्यापुढे थैमान घालू लागतात.

गणितातील निरनिराळी उदाहरणे, भूमितीतील त्रिकोण चौकोन, शास्त्रातील प्राणवायू, इंग्रजी पुस्तकातील कधीच न समजणारे धडे आणि कधीही न लक्षात राहणाऱ्या इतिहासाच्या तारखा. हे सगळे पास होण्या साठी पाठ करायला लागते, मग मित्रांन कडून पुस्तके घेऊन अभ्यास करावा लागतो. खेळणे सोडून संपूर्ण दिवस उत्तरांचा शोध घ्यावा लागतो.

पहाटे उठून अभ्यास सुरु करायचा तो थेट शाळेची वेळ होईपर्यंत. तरी पण खेळ बंद शाळा सुटली कि लवकरात लवकर घरी जायचे आणि थोड्या वेळाने जेवण आवरून परत अभ्यासाला बसायचे, रात्र भर जागरण मग तो दिवस उगवतो, मी गडबडीने शळेत जातो कधी कधी काही लेखन साहित्य घरीच विसरतो, मग तर माझी फारच तारांबळ उडते.

मनातल्या मनात मी परीक्षे ला शिव्या देऊ लागतो. असे वाटते नकोत्या परीक्षा पद्धती बंद करून टाकाव्या. सगळ्यांना पास करू वरच्या वर्गात टाकावे. पण आमचे ऐकणार कोण ! परीक्षा तर होताच राहणार आणि आमची फजीतीही होताच राहणार. जागरणे करावीच लागणार. खेळात अडथला येनारच आणि परीक्षा आपल्या आनंदी जीवनाची नासाडी करणारच.

HOPE IT HELPS YOU...

GOOD MORNING...

Answered by lata40386
0

Explanation:

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आदर्श विद्यार्थी मराठी निबंध बघणार आहोत. आदर्श विद्यार्थी म्हणजे चांगले आचरण करणारा विद्यार्थी. आदर्श विद्यार्थी विद्येवर प्रेम करतो. पुस्तके वाचून त्याचे मनन चिंतन करतो.

वर्गात प्रथम श्रेणी प्राप्त करण्यासाठी आळस झटकून अभ्यास करतो. आवश्यक ते पाठ करतो. तो जिज्ञासू असतो. नेहमीच नवीन काही शिकण्यास तयार असतो. एखादी गोष्ट त्याला स्वत:ला येत नसेल व त्याच्यापेक्षा लहान असणाराला येत असेल तर त्याच्याकडून शिकण्यात त्याला अपमान वाटत नाही.

विद्यार्थी जीवनाचे अमूल्य महत्त्व लक्षात घेऊन विद्याप्राप्तीच्या बाबतीत तो कधी बेसावध राहत नाही. कठोर परिश्रम करून ज्ञान मिळविणे हे त्यांचे एकमात्र उद्दिष्ट असते. विद्याच त्याला विनम्र बनविते. संस्कृतमध्ये एक म्हण आहे 'विद्या विनयेन शोभते'. आदर्श विद्यार्थी अभ्यासाबरोबरच खेळातही भाग घेतो.

निरोगी शरीरात निरोगी मन असते. म्हणून तो खेळाच्या वेळी खेळ आणि अभ्यासाच्या वेळी अभ्यास करतो. आदर्श विद्यार्थी नेहमी साधी रहाणी व उच्च विचारसरणी या मंत्राचे पालन करतो.

आदर्श विद्यार्थ्याचे उद्दिष्ट हे असते की, सदाचारी आणि आदर्श बनून इतर वर्ग बंधूंना मदत करणे. म्हणून तो गुरुजन, माता-पित्यांचा नेहमी आदर करतो. आपल्या वर्गबंधूवर प्रेम करतो, त्यांना मदत करतो. घरकामात मदत करतो. योग्य व पौष्टिक आहार घेतो. सगळ्यांशी मिळून-मिसळून वागतो म्हणून त्याला कुणी शत्रू असत नाहीत.

तो नियमित शाळेत जातो व आपला गृहपाठही करतो. आदर्श विद्यार्थी नेहमी गोड व सत्य बोलतो. थोर लोकांची चरित्रे वाचून त्यांच्या प्रमाणे होण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या चांगल्या वागणूकीची सर्वांवर छाप पडते. अशा प्रकारे आदर्श विद्यार्थ्यात अनेक गुण एकवटलेले असतात.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.

धन्‍यवाद

hope it helps you!

if yes then please mark my answer as brainliest!!!!!!

Similar questions