India Languages, asked by allsubjest35, 4 months ago

परीक्षा नसत्या तर निबंध​.

Answers

Answered by zaidiqureen
14

Answer:

परीक्षा नसत्या तर निबंध.

Explanation:

आजच्या स्पर्धेच्या जगामध्ये विद्यार्थ्यांना पदोपदी परीक्षांना सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांना या परीक्षांच्या वेढ्यातून सुटकेचा निःश्वास घेताच येत नाही. परीक्षा आणि विद्यार्थी यांचे एकदम घट्ट नाते असते. त्यामुळे एखाद्याला वाटले की आपण विद्यार्थी होऊन शिक्षण घ्यावे, तरीही त्याला परीक्षांना सामोरे जाणे नको वाटते. विद्यार्थी या शब्दाचा अर्थ काय तर - 'विद्या + अर्थी' विद्या संपादन करणारा. विविध प्रकारचे ज्ञान ग्रहण करणे, आत्मसात करणे. माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे विविध गोष्टींबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तो आतुर झालेला असतो. लहान-लहान मुले सुद्धा अनेक उपस्थित करत असतात. तेव्हा त्यांना उत्तरे देणे भाग पडते. ज्ञानअर्जित करण्यासाठी शाळेत जाणे कोणाला नको असते. पण ज्या वेळी त्या अर्जित केलेल्या ज्ञानाची परीक्षा घेतली जाते. तेव्हा ती विद्यार्थाला नकोशी वाटत असते. कधी कधी मनात असा विचार येतो की याच परीक्षा नसत्या तर... तर काय झाले असते?

परीक्षा नसत्या तर... मुलं परीक्षा नाहीत या विचाराने खुश होऊन गेली असती . परीक्षेचे मोठे ओझेच डोक्यावरून दूर झाल्याने ते पार्टी, सहली आणि सिनेमा यांची मजा घेत त्यांनी आपला अनमोल वेळ वाया घालवला असता.

आजकाल घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये विद्यार्थांनी अर्जित केलेल्या ज्ञानाची परीक्षा न घेता त्यांच्या स्मरणशक्तीची परीक्षा घेत असल्याचे जाणवते. परीक्षा घेतल्या जात असल्याकारणाने आजकाल विद्यार्थी फक्त मार्गदर्शनावर अवलंबून आहेत. ते शिकत असलेल्या विषयाबाबत खोलवर जाऊन अभ्यास करण्याचा ते विचारसुद्धा करत नाहीत. परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थी अपेक्षित प्रश्नसंच आणि अतिमहत्वाच्या प्रश्नांच्या मागे वेड्यासारखे लागतात. कशाही प्रकारे येणाऱ्या परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होणे आणि पास झालेल्याचे प्रमाणपत्र मिळवणे एवढेच ध्येय आज विद्यार्थ्यांचे बनले आहे. परीक्षा नसत्या तर पदवी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थाना मेहनत घ्यावी लागली नसती.

Similar questions