India Languages, asked by subratakolay1, 6 hours ago

परीक्षा नसत्या तर.... या वर निबंध लिहा.
______________________
subject: मराठी
please send quick and correct answer.​

Answers

Answered by harshchhawal233
1

Answer:

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण परीक्षा नसतील तर मराठी निबंध बघणार आहोत. सोसायटीतील 'ऑर्केस्ट्रा'च्या कार्यक्रमाला संजूला जायचे होते, पण आई कडाडली, 'वेड्या, चार दिवसांवर परीक्षा आली अन् तू काय वेळ घालवणार ? काही जायचं नाही.' झाले! संजूने हातपाय आपटले अन् म्हटले या परीक्षाच नसत्या तर बरं झालं असतं.'

खरेच! परीक्षा नसत्या तर मुलांना सतत अभ्यासात बुडून जावे लागले नसते. आज काय आठवड्याची परीक्षा, मग मासिक परीक्षा, मग चाचणी, मग सहामाही, नंतर नऊमाही व शेवटी वार्षिक. अशा सतत परीक्षा चालू असतात. अन् मुलांना सतत मान मोडून अभ्यासात गर्क राहावे लागते. कारण परीक्षेत कमी गुण मिळाले तरी सरासरी गुण कमी होणार. अन् हल्ली तर एकाएका मार्काने नंबर मागे जात असतो. या अशा अतिशय स्पर्धेचा, मुलांच्या मनावर भयंकर ताण येतो. शिवाय मुले मग परीक्षार्थीच बनतात

Similar questions