परिसर
अभ्यास1
जलव्यवस्थापन म्हणजे काय ?
Answers
Answer:
‘पाणी हा प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे.’ असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने राज्य घटनेतील २१ कलमानुसार जगण्याच्या हक्काच्या आधारे दिला आहे. पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा हक्क प्रत्येकाला सरकारने कसा मिळवून द्यावयाचा यासंबंधी न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. पाणीटंचाईच्या परिस्थितीवर मात करावयाची असेल तर तंत्र-विज्ञानाचा कास धरावी लागेल म्हणून हा प्रश्न केंद्र सरकारच्या विज्ञान- तंत्रज्ञान आणि जलव्यवस्थापन मंत्रालय आणि जलक्षेत्राशी संबंधित शास्त्रज्ञांच्या साहाय्याने एक समिती गठीत करून सोडवावा असा आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
समितीने युद्धपातळीवर हे काम करावयाचे असून समितीने कोणती कामे करावयाची आहेत तीही न्यायालयाने नमूद केली आहेत. खार्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणार्या बिनखर्ची पद्धतीचा वापर, पावसाचे व पुराचे पाणी याचे व्यवस्थापन, पाणी साठवणूक, सांडपाणी प्रक्रिया, पाणथळ जमिनीचे संरक्षण या सर्व उपायांसह अन्य इतर उपायांबाबत समितीने विचार करावा असे या आदेशात नमूद करणयात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाण्याचा हक्क मूलभूत असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.
पाण्याचा मूलभूत हक्क लोकांनी मिळवून द्यावयाचा असेल तर कोणत्या क्षेत्राला किती पाण्याची आवश्यकता आहे याचा प्रथम आढावा घ्यावा लागोल. कोणाला किती, कधी आणि कसे पाणी मिळेल आणि पाण्याचा हक्क प्राधान्याने कोणाचा आहे आणि प्राधान्यक्रमाने पाणी मिळते का याचा शोध घ्यावा लागोल. पाणी उपलब्ध करून द्यावयाची आणि समन्यायी पद्धतीने पाणी वाटपाची प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवावी लागेल.
Explanation: