३) परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र सरकारी हॉस्पिटल किंवा दवाखाना यापैकी एका ठिकाणी भेट द्या.
शासनाच्या आरोग्य सुविधांबाबत जाणून घ्या. त्यामध्ये बालके स्त्रिया वृद्ध आर्थिक दुर्बल यांच्यासाठी
असणाऱ्या शासनयोजनांबद्दल जाणून घ्या. त्या क्षेत्रभेटीचा अनुभव पुढे तुमच्या शब्दात लिहा.
Answers
Explanation:
प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य कामे
स्त्रिया आणि मुलांच्या आरोग्याकरिता आखलेले राष्ट्रीय कार्यक्रम राबवणे.
हिवताप, हत्तीरोग, टी.बी. कुष्ठरोग, अंधत्व, लैंगिक रोग आणि एड्स वगैरे आजारांचे नियंत्रण.
सहा रोगांवर लसीकरण करणे.
गरोदरपण, बाळंतपण आणि बाळंतपणानंतर लागणारी आरोग्य सेवा पुरवणे. हल्ली सरकारने सर्व बाळंतपणे घरी न होता रुग्णालयात व्हावी या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहेत.
शाळेतल्या मुलांची वैद्यकीय तपासणी आणि उपचार करणे.
सांसर्गिक आजारांचा प्रतिबंध व उपचार.
संततिनियमनाच्या सेवा, शस्त्रक्रिया तसेच सुरक्षित गर्भपात करणे.
आजार रोखण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी आरोग्य प्रशिक्षण देणे.
रोगांचे निदान, उपचार आणि रोगांच्या प्रतिबंधासाठी मोहीम राबवणे.
जत्रांमध्ये आणि आठवडे बाजारांच्या ठिकाणी आरोग्य सेवा पुरवणे.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर ओपीडीत रुग्णांवर उपचार करतात. काही रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखलही केले जाते. उपकेंद्रातील आरोग्यसेवकांच्या सल्ल्याने रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होतात. कधी कधी प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णांना ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात नेले जाते.