पर्यावरन म्हणजे काय ?
Answers
मराठी शब्दबंधातील पर्यावरण या शब्दाच्या व्याख्येनुसार सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. [१] वैज्ञानिक पारिभाषिक कोशानुसार पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान, इत्यादी सर्वांचा समावेश होतो. [२] मराठी विश्वकोशातील व्याख्येनुसार विशिष्ट वेळचे पर्यावरण म्हणजे शिलावरण, जलावरण, जीवावरण व वातावरण या मुख्य भूवैज्ञानिक घटकांतील सतत चालू असणार्या प्रक्रिया व आंतरक्रिया यांचा परिणाम होय. [३]
मराठी विश्वकोशानुसार सर्व सजीव व पर्यावरण एकात्मपणे परस्पराश्रयी असतात. [४]
सजीवांना त्यांच्या जीवनसंघर्षासाठी आणि उत्क्रांतीमध्ये सभोवालतच्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागते अथवा अनुकूल असे बदल करावे लागतात. जे सजीव आपल्यात बदल घडवून आणण्यात कमी पडतात किंवा काही कारणास्तव ते स्वतःमध्ये बदल घडवू शकत नाही त्यांना आपल्या प्राणास मुकावे लागते. कारण जो बदल स्वीकारतो तोच येथे तग धरून राहू शकतो. पर्यावरण आणि मानव यांचे परस्पर संबंध नेहमी बदलत असतात.[ संदर्भ हवा ] [५] पर्यावरणाचे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्षण प्रत्येकाचे कर्तव्य आहे.