पर्यावरणाचे रक्षण या विषयावर बालनाट्याचे तुमच्या शब्दात संवाद लेखन लिहा.
Answers
Answer:
Are but yacha answer tr khup motha ahe na trrrr.....
Answer:
पर्यावरण रक्षणाविषयी समाजात जागृती करण्याच्या उद्देशाने 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'पृथ्वीरक्षण' हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या पर्यावरण संरक्षणाबाबत अधिक जागरुकपणे काम करावे यासाठी नववर्षाच्या प्रारंभी 'मटा'च्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाची शपथ राज्यभरात विविध शाळांमध्ये देण्यात आली. हा उपक्रम आता राज्य सरकारसाठीही दिशादर्शक ठरला असून, आज, बुधवारी राज्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शाळांमध्ये पर्यावरण संरक्षणाची शपथ दिली जाणार आहे. स्वत:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी १०.३० वाजता ही शपथ देतील.
पर्यावरण रक्षण हा सध्या कळीचा मुद्दा झाला असून त्यासाठी स्वच्छता, प्लास्टिकबंदी, वृक्ष लागवड असे पृथ्वीरक्षणाचे विविध उपक्रम 'महाराष्ट्र टाइम्स'ने हाती घेतले आहेत. हे उपक्रम विविध शाळांमध्ये वर्षभर सातत्याने राबवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाबाबत अधिक जागरुकपणे काम करावे, हा 'महाराष्ट्र टाइम्स'चा हेतू आहे. त्या दृष्टीने पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी लिहिलेली शपथ मध्यंतरी राज्यातील विविध शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांनाही देण्यात आली. महाराष्ट्र टाइम्सतर्फे त्याचे आयोजन करण्यात आले होते. तशी शपथ घेऊन शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी पर्यावरण रक्षणाविषयीची आपली बांधिलकी दृढ केली आहे. 'मटा'च्या या उपक्रमाअंतर्गत राज्यातील मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, सांगली, सातारा आदी भागांतील शाळांमधील सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी ही शपथ घेतली.
राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या सरकारनेही अशी शपथ देण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे. पर्यावरणविषयक जनजागृती करण्यासाठी 'स्वागत भारतीय प्रजासत्ताक दिनाचे... ध्येय समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाचे' या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना तशी शपथ दिली जाणार आहे. या शपथेचे आज, बुधवारी सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्रिमूर्ती प्रांगणातून वाचन करणार असून त्याचे थेट प्रसारण मुंबई दूरदर्शनवरून केले जाईल. राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी यावेळी शाळेत उपस्थित राहून या शपथेचे वाचन करावे, असा शासन निर्णय काढण्यात आला आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व शालेय शिक्षण विभागाच्या सहकार्याने आयोजित केला जाणार आहे.
Explanation: