पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण निबंध
Answers
Answer:
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विळद येथील वनक्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले. या भागात जवळपास एक हजार रोपे लावण्यात आली. त्यामुळे वनविभागाच्या वतीने दोन ते तीन ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी वनविभागाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक संजय कडू, वनक्षेत्रपाल भास्कर शिंदे, देविदास पातारे उपस्थित होते.
जिल्ह्यात मंगळवारी पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. विळद येथील वनक्षेत्रात इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा उपक्रम घेण्यात आला. वनविभागाचे उपवनसंरक्षक रेड्डी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या परिसरात जवळपास एक हजार रोपे लावण्यात आली. या रोपांची देखभाल व संवर्धन करण्याचे काम वनविभागाकडून केले जाणार आहे. या वेळी वनविभाग, इंडियन ऑइलचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण दिनानिमित्त वनविभागानेही मोजकेच उपक्रम आयोजित केले होते. पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत नागरिकांत जनजागृती करण्याकडे मात्र दुर्लक्ष झाले. वनविभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळानेही याकडे दुर्लक्ष केले आहे.
प्रेस क्लब व पोलिस दलाच्या संयुक्त विद्यमाने पोलिस मुख्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, दशरथ हटकर, अमितकुमार लिगडे उपस्थित होते. दोन वर्षांपूर्वी देखील मुख्यालयाच्या आवारात प्रेस क्लब व पोलिस दलाच्या वतीने वृक्षरोपणाचा उपक्रम घेण्यात आला होता. नगर कॉलेजच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी रजिस्ट्रार अरुण बळीद, डॉ. शरद बोरुडे, डॉ. प्रकाश सूर्यवंशी, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. अभय शालिग्राम, डॉ. एन. एस. गायकवाड, डॉ. सय्यद रजाक उपस्थित होते. नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेहरु युवा केंद्र व किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. रोपे जगविण्यासाठी वृक्ष संवर्धनाचा संकल्प घेण्यात आला.
विद्यार्थ्यांनी सादर केले पथनाट्य
पर्यावरण दिनानिमित्त तक्षिला स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहरातील प्रोफेसर चौकात प्लास्टिक बंदी वर पथनाट्य सादर केले. या पथनाट्यात प्लास्टिकने होणारे दुष्परिणाम तसेच होणाऱ्या आजारांची माहिती देण्यात आली. हे टाळण्यासाठी प्लास्टिक बंदी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सोना नगर चौक ते प्रोफेसर चौक अशी सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थ्यांनी प्लास्टिक हटाओ देश बचाओ अशा घोषणा दिल्या. तक्षिला स्कूलच्या मैदानात वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण