पर्यटकांशी स्थानिक या नात्याने तुम्ही कसे वागाल?
Answers
hajjwjbe jsjwjkw jwjhwbwh akammamam
Answer:
मी स्थानिक या नात्याने माझ्या देशात येणाऱ्या पर्यटकांशी अगदी प्रेमाने व नम्रेतेने वागणार. त्यांना आपली स्थानिक भाषा माहित नसते किंवा समझत नसते,तेव्हा मी त्यांच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न करणार,त्यांची भाषा जर मला येत असेल,तर त्यांच्या भाषेत बोलून मी त्यांच्याशी संवाद करणार.
आपल्या देशातील काही लोक पर्यटकांची टिंगल करतात,त्यांना लुबाडतात.अशा लोकांमुळे आपल्या देशाचे नाव खराब होते.तेव्हा,मी अशा लोकांना पर्यटकांशी वाईट वागण्यापासून थांबवणार.
पर्यटकांना कधी कधी एखाद्या ठिकाणाचा पत्ता, राहण्यासाठी जागा शोधण्यात समस्या होते.त्यावेळी मी त्यांची मदत करणार.'अतिथि देवो भवः', या प्रसिद्ध म्हणीवर माझा विश्वास आहे.या म्हणीनुसार पाहुण्यांना देव समजले जाते, पर्यटकांशी संपर्क साधताना मी या म्हणीचे पाळण करणार.
Explanation: