पर्यटनाचे महत्व लिहा
Answers
Answer:
पर्यटनशास्त्र (Tourism) :-पर्यटन ही संज्ञा प्रवास (Tour) या शब्दाशी संबंधित आहे आणि प्रवास (Tour) हा शब्द लॅटिन भाषेतील 'Tornos' या शब्दापासून आलेला आहे. Tornos शब्दाचा मूळ अर्थ 'वर्तुळ' किंवा 'वर्तुळाकार' असा आहे. याच शब्दापासून पुढे 'वर्तुळाकार प्रवास' किंवा पॅकेज टूर्स हा शब्द रुढ झाला.
एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय.
मनोरंजन, फुरसत किंवा कामासाठी केलेला प्रवास म्हणजेच पर्यटन. जागतिक पर्यटन संस्था (World Tourism Organization) ही 'जे लोक प्रवास करून आपल्या परिसराबाहेरील जागी जाऊन सलग १ वर्षापेक्षा कमी काळ मनोरंजन, काम वा इतर कारणांसाठी रहातात ते' अशी पर्यटकांची व्याख्या करते.
पर्यटन हे फुरसतीचा वेळ घालविण्याचे एक साधन म्हणून जगभरात अतिशय लोकप्रिय झाले आहे. २००० च्या शतकाच्या अखेरीस आलेल्या जागतिक मंदीने व H1N1 फ्लूच्या साथीने २००८ च्या मध्यापासून ते २००९ च्या अखेरपर्यंत रोडावलेल्या पर्यटनाला परत बरे दिवस आले असून २०१२ मध्ये जागतिक पर्यटकांच्या संख्येने १०० कोटीचा पल्ला इतिहासात पहिल्यांदा ओलांडला. आंतरदेशीय पर्यटन उत्पन्न (आंतरदेशीय देणे जमाखात्यातले पर्यटनावरचे उपखाते) २०११त १.०३ लाख कोटी अमेरिकन डॉलर (७४ हजार कोटी युरो) इतके वाढले. ते २०१० च्या तुलनेत ३.८% अधिक होते. २०१२त चीन जगातील पर्यटनावर सर्वात जास्त खर्च करणारा देश बनला आणि त्याने अमेरिका व जर्मनी यांना त्याबाबतीत मागे टाकले. चीन व उदयोन्मुख राष्ट्रे (रशिया व ब्राझील ठळकपणे) ह्यांचा पर्यटनावरचा खर्च गेल्या दशकात लक्षणीय वाढला आहे.
hope it helps you
follow please