History, asked by charviii2920, 18 days ago

पर्यटनामागील हेतू स्पष्ट करा.(सविस्तर उत्तरे लिहा)​

Answers

Answered by bharatmunde
4

Answer:

पर्यटनाची व्याख्या?

जागतिक पर्यटन संस्थांच्या व्याख्येप्रमाणे – ‘चोवीस तासापेक्षा अधिक व एक वर्षापेक्षा कमी काळ, घर व कामाची जागा सोडून इतर जागी राहणे, तेथील दृश्ये पाहणे आणि आनंद लुटणे म्हणजे पर्यटन’. अशी औपचारिक (formal) व्याख्या करायला गेल्यास ती अधिकच क्लिष्ट होत जाईल म्हणून मी आपल्या सोप्या मराठी भाषेत सांगायचा प्रयत्न करेन.

पर्यटन म्हणजे काय?

“एकटे किंवा समूहाने, घर आणि कामाच्या जागे व्यतिरिक्त दूर राहून तेथील गोष्टींचा आनंद घेणे व वापर करणे, तेथंपर्यंत प्रवास करणे, तेथील खाणं-पिणं-राहणं, मनोरंजन, खरेदी, तेथील स्थानिकांशी संवाद-भेटीगाठी घेणं, तसेच यामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व घटना, आपण केलेलं नियोजन व आपली योजना, संपर्कात येणाऱ्या संस्था व उद्योग, या सर्वांच्या एकूण सहभाग व समावेशातून आपल्याला मिळणारा अनुभव (experience) किंवा अनुभवांची शृंखला म्हणजे पर्यटन.“

पर्यटनाची नक्की सुरुवात कोठून होते आणि कुठे संपते हे सांगणे तसे अवगड आहे. परंतु सर्वसाधारणपणे, आपल्या मनात एखाद्या जागेविषयी/दृश्याविषयी आवड निर्माण होते, तेथूनच खरी पर्यटनाची सुरुवात होते आणि तेथे जाऊन तो अनुभव घेऊन येईपर्यंत पर्यटन सुरूच असते. फेसबुकवर मित्र किंवा मैत्रिणीने टाकलेला एखादा फोटो असेल, चित्रपटातील एखादे दृश्य असेल किंवा वर्तमानपत्रातील एखादे लेखन असेल, ते पाहून-वाचून आपल्यालाही त्या जागी जाऊन येण्याची, ते सौंदर्य दृश्य प्रत्यक्ष पाहण्याची सुप्त इच्छा मनामध्ये जागृत होते. ती इच्छाच पर्यटनाची सुरुवात असते. त्या इच्छेने आपण त्याबद्दल अधिक माहिती गोळा करायला सुरुवात करतो. मग तिथे पोहोचण्यासाठी बजेट व सोयीचा रस्ता व वाहतूक यांची निवड करतो. तेथे राहण्याची सोय करतो. आपण प्रत्यक्ष तेथे जाऊन त्या गोष्टीचा अनुभव घेऊन येतो आणि तो अनुभव मित्र-मैत्रिणींशी प्रत्यक्षात किंवा सोशल मेडिया मध्ये शेअर करतो. ते पाहून इतरांच्या मनामध्ये सुद्धा तो अनुभव घेण्याची इच्छा जागृत होते.

एकंदरीत प्रवास व पर्यटनासाठी एखादी प्रेरणा(motivation), हेतू, उद्देश किंवा निश्चय असणे गरजेचे आहे. कृषी पर्यटन आणि शाश्वत पर्यटन यासारख्या पर्यटनामागे ही जसा वेगळा उद्देश असतो त्याप्रमाणे प्रत्येक पर्यटनामागे वेगवेगळे हेतू असतो. या प्रेरणा किंवा उद्देशानुसार पर्यटनाचे अनेक वेगवेगळे प्रकार पडतात. सण-समारंभासाठी गावी जाणे असो किंवा कार्यासाठी/दर्शनासाठी एखाद्या धार्मिक ठिकाणी जाणे असो, कामानिमित्त बाहेरगावी-परदेशी जाणे असो किंवा दवाखान्यासाठी घरापासून दूर जाणे असो, हे सर्व पर्यटनाचाच भाग आहेत. फक्त आरामासाठी, मौजमजेसाठी किंवा आनंदासाठी फिरायला जाणे म्हणजे पर्यटन नव्हे. follow please and like

Similar questions