India Languages, asked by moinahmed9869, 1 month ago

paragraph:
आनंदवनामध्ये बाबांनी कुष्ठरोग्यांना स्वाभिमानाने जगायला शिकविले. राहण्यासाठी झोपड्या बांधणे, अन्नधान्यासाठी शेती करणे यापासून अनेक पूरक उद्योग त्यांनी सुरू केले. अर्थात ही प्रक्रिया सोपी नव्हती. अनेक अडचणी होत्या पण त्यावर मात करत बाबांनी भंगलेल्या शरीरांना, खचलेल्या मनांना जगण्याची उभारी दिली. ताठ मानाने जगण्याची प्रेरणा दिली. आनंदवनात बाबांनी कुष्ठरोग्यांवर उपचार केले. त्यांना निवास उपलब्ध करून दिला. शिवाय त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी साधने उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांना कष्टाची भाकरी मिळवता आली. त्यांच्या कलागुणांना वाव दिला त्यामुळे दैवाने मोडतोड केलेल्या चेहऱ्यावर हास्य उमलले. हे हास्य समाधानाचे आत्मविश्वासाचे होते. बोट झडलेल्या थिट्या हातांना कामाची सवय लागावी आणि स्वाभिमानाचा ताठ कणा लाभावा यासाठी आनंदवनाची धडपड आहे.

question is:

कृती १ इ) शब्दजाल पूर्ण करा.

बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी केलेले कार्य (4 शब्दजाल)

2) आनंदवनाची धडपड कशासाठी असते​

Answers

Answered by srushti3012
1

Answer:

1 स्वाभिमानाने जगायला शिकवले

Similar questions