परकीय / विदेशी कंपन्यांनी आपल्या देशात केलेली गुंतवणूक
Answers
Answer:
भारतीय अर्थव्यवस्थेत १९९१ मध्ये खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरणाच्या धोरणाचा अवलंब केल्यानंतर आर्थिक विकासात विदेशी गुंतवणुकीचे अनन्यसाधारण महत्व राहिलेले आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेतील विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक (FDI) ही ४६.४ दशलक्ष डॉलर एवढी राहिली असून, एकूण १८% एवढी वाढ आपण FDI गुंतवणुकीमध्ये अनुभवली आहे.
आर्थिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकासाठी या विषयाची मुलभूत माहिती असणे क्रमप्राप्त ठरते. प्रत्येक सुशिक्षित व सुजाण भारतीय नागरिकासाठी आणि विशेष करून विविध स्पर्धात्मक परीक्षांची वा मुलाखतींची तयारी करणाऱ्या युवकांसाठी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक (FDI) तसेच विदेशी संस्थात्मक गुंतवणूक (FII) या संकल्पनांची मुलभूत समज असणे अत्यंत आवश्यक आहे. ह्याच अनुषंगाने आजच्या या लेखामधून आपण FDI आणि FII विषयाशी संबंधित माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
श्री अरविंद मायाराम यांच्या नेतृत्वाखालील अभ्यास गटाने २०१३ मध्ये FDI आणि FII गुंतवणूक यांच्यामधील नेमका फरक स्पष्ट केलेला आहे. मूळतः परकीय थेट गुंतवणूक (FDI) म्हणजे भारताबाहेर राहणाऱ्या अनिवासी संस्था किंवा अनिवासी व्यक्तींनी भारतीय कंपन्यांमध्ये केलेली थेट भांडवली गुंतवणूक होय, तर भारताबाहेर राहणाऱ्या अनिवासी संस्था किंवा अनिवासी व्यक्तींनी प्रत्यक्ष गुंतवणूक न करता भारतीय गुंतवणूक संस्थांच्या माध्यमातून शेअर बाजारातून भारतीय कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक म्हणजे परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक. परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक ही परकीय संस्थात्मक गुंतवणुकीच्या (FII) स्वरुपात असू शकते किंवा परकीय पात्र गुंतवणुकीच्या (QFI) स्वरूपात असू शकते.
अरविंद मायाराम अभ्यासगटाच्या मते कुठल्याही विदेशी गुंतवणूकदराने अथवा विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदराने सुचीकृत भारतीय कंपनीत कंपनीच्या एकूण भांडवलाच्या १०% पर्यंत केलेली गुंतवणूक ही परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक म्हणून गिणली जाते, तर सुचीकृत भारतीय कंपनीत १०% हून जास्त अथवा असुचीकृत कंपनीमधील कुठलीही गुंतवणूक ही विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक (FDI) म्हणून मानली जाते. साधारणतः FDI ही दीर्घकाळासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी भरीव कार्य करणारी अशा प्रकारची गुंतवणूक असते तर FII गुंतवणूक ही कमी का