Hindi, asked by ansarilatif986, 3 months ago

परमवीर चक्र कोणी तयार केले,
?​

Answers

Answered by josnaelsajoseph
9

Answer:

भारत देशाच्या रक्षणार्थ सदैव झटणाऱ्या सैनिकांसाठी परमवीर चक्र हे सर्वात मोठे मानचिन्ह आहे. ते पदक मिळवणे म्हणजे कोणत्याही सैनिकासाठी सर्वोच्च अभिमानाची गोष्ट आहे.

एखाद्या सैनिकाला हे परमवीर चक्र त्याने गाजवलेल्या शौर्याच्या आधारावर दिले जाते.

पण तुम्हाला माहित आहे का या परमवीर चक्राचे डिजाईन कोणी तयार केले आहे? तर मंडळी या प्रश्नाचे उत्तर ऐकून तुमची ही छाती अभिमानाने फुलल्याशिवाय राहणार नाही.

कारण परमवीर चक्राचे डिजाईन तयार करणारी स्त्री ही मराठी होती. सावित्री खानोलकर त्यांचे नाव!

सावित्री खानोलकर या मुळच्या मराठी नव्हे. त्यांचा जन्म २० जुलै १९१३ रोजी स्वित्झर्लंडमध्ये एका हंगेरियन कुटुंबामध्ये झाला होता. त्यांचे मूळनाव इव्ह मॅनेये डे मारोस हे होते.

वयाच्या १६ व्या वर्षी इव्ह यांची विक्रम खानोलकर यांच्याशी भेट झाली. विक्रम खानोलकर हे मराठी कुटुंबामध्ये जन्मले होते. ते भारतीय लष्करामध्ये एक मोठे अधिकारी होते आणि इंग्लंड मध्ये रॉयल मिलेटरीचे प्रशिक्षण घेत होते.

पुढे काही भेटींमध्येच इव्ह आणि विक्रम यांचे संबंध जुळले.

परंतु, त्यांच्या आई – वडिलांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली नाही, कारण त्यांच्या वयामध्ये आणि संस्कृतीमध्ये खूप फरक होता.

मात्र काही वर्षांनी १९३२ मध्ये इव्ह भारतामध्ये आल्या आणि तिने विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर सावित्री खानोलकर हे मराठमोळे नाव त्यांनी स्वीकारले.

युरोपियन पार्श्वभूमीतून आल्या असूनही त्यांनी भारतीय संस्कृतींशी जुळवून घेतले. त्यांनी शाकाहार आत्मसात केला, हिंदू प्रथा त्या पाळू लागल्या.

लोकसाहित्य, नृत्य, चित्रकला आणि संगीत यांसारख्या शास्त्रीय कलांमध्ये त्यांनी नैपुण्य मिळवले. एवढेच नाही, तर त्या अस्खलित हिंदी, मराठी आणि संस्कृत बोलू शकत असत.

हिंदू पौराणिक ग्रंथांचे आणि भारताच्या इतिहासाचे त्यांनी सखोल ज्ञान घेतले होते. परमवीर चक्र बनवणाऱ्या मेजर जनरल हिरालाल अटल यांनी सावित्री खानोलकर यांचे हेच ज्ञान लक्षात घेऊन त्यांना परमवीर चक्राचे डिझाईन बनवण्यास सांगितले.

त्यानुसार सावित्री यांनी हिंदू पुराणांतील ऋषी दधीची यांच्या कथे पासून प्रेरणा घेऊन मेडलचे डिजाईन तयार केले. ऋषी दधीची यांनी इंद्र वज्र निर्माण करण्यासाठी आपल्या अस्थींचे दान केले होते.

सावित्री यांनी बनविलेल्या डिजाईन मध्ये पदकाला जोडण्यासाठी एक जांभळी रिबीन आहे आणि पदकावर इंद्र वज्राच्या चार प्रतिकृती आहेत, ज्या ऋषी दधीची यांनी केलेल्या समर्पणाचे प्रतिक आहेत आणि मध्यभागी अशोकस्तंभ आहे.

योगायोगाने त्यांनी डिजाईन केलेले प्रथम परमवीरचक्र त्यांचा जावई मेजर सोमनाथ शर्मा यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आले.

पायलटचा परवाना मिळवणाऱ्या सावित्री खानोलकर या पहिल्या भारतीय महिल्या होत्या. जालंधरच्या उत्तर भारतीय फ्लायिंग क्लबमधून त्यांनी हा परवाना मिळवला होता.

१९५२ मध्ये त्यांचे पती विक्रम खानोलकर यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी समाजकार्यात आपले लक्ष केंद्रित केले. १९९० मध्ये मृत्यूला कवटाळेपर्यंत त्यांनी हा समाजकार्याचा वसा काही केल्या सोडला

Answered by sanket2612
0

Answer:

या प्रश्नाचे उत्तर आहे सावित्री खानोलकर.

Explanation:

सावित्रीबाई खानोलकर या एक डिझायनर होत्या, ज्यांना परमवीर चक्र, भारतातील सर्वोच्च लष्करी सजावट, युद्धकाळात विशिष्ट शौर्याचे कृत्य दाखविल्याबद्दल पुरस्कृत करण्यासाठी ओळखले जाते.

खानोलकर यांनी अशोक चक्र, महावीर चक्र, कीर्ती चक्र, वीर चक्र आणि शौर्य चक्र यासह इतर अनेक प्रमुख शौर्य पदकांची रचना केली.

तिने जनरल सर्व्हिस मेडल 1947 देखील डिझाइन केले होते, जे 1965 पर्यंत वापरले गेले होते.

खानोलकर हे चित्रकार आणि कलाकारही होते.

स्वित्झर्लंडमधील न्युचॅटेल येथे इव्ह इव्होन्ने मॅडे डी मारोसचा जन्म झाला, तिने 1932 मध्ये भारतीय लष्कराचे कॅप्टन विक्रम रामजी खानोलकर यांच्याशी लग्न केले आणि त्यानंतर तिचे नाव बदलून सावित्रीबाई खानोलकर असे केले, ती हिंदू झाली आणि भारतीय नागरिकत्व प्राप्त केले.

#SPJ3

Similar questions