History, asked by morenayan08, 19 days ago

परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक ​

Answers

Answered by sadiasamrin10
6

Answer

परराष्ट्र धोरण प्रक्रियेत सुषमा स्वराज यांना दुर्लक्षित केल्याचे चित्र प्रसारमाध्यमात उभे केले गेले. मात्र, गेल्या दोन वर्षांत मोदी यांचा परराष्ट्र दौरा यशस्वी व्हावा यासाठीची पाश्र्वभूमी तयार करण्याचे काम स्वराज यांनी मोठय़ा कुशलतेने केले आहे. स्वत: स्वराज यांच्याशिवाय राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व अन्य मंत्रीही विविध राष्ट्रांना भेटी देऊन मोदी सरकारचा कार्यक्रम पुढे नेत आहेत. भारताने स्वीकारलेले आक्रमक राजनयाचे धोरण प्रत्यक्षात उतरवण्याची खरी जबाबदारी आता परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांची आहे.

hope it will help you

mark as brainlist answer plz

Answered by rahulgholla
4

Hi,

Here's your answer friend

परराष्ट्रीय धोरण: प्रत्येक राज्य आपणास इष्ट असलेले वर्तत इतर राज्यांनी करावे, यासाठी आपल्या मर्यादित प्रभावाचा विविध स्वरूपांत वापर करून त्या त्या राज्यातील राज्यकर्त्यांचे मनवळविते, यालाच स्थूलमानाने परराष्ट्रीय धोरण म्हणता येईल. एकोणिसाव्या शतकात राष्ट्रवादाच्या उदयानंतर प्रत्येक राष्ट्र स्वतंत्र असावे, हे तत्त्व सर्वमान्य झाले. जगातील अशा स्वतंत्र राष्ट्रांच्या परस्परसंबंधास आकार लाभून त्यातून एका आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे रूप निर्माण झाले. आधुनिक काळात प्रत्येक राष्ट्र आंतरराष्ट्रीय समुदायाचा एक भाग असल्यामुळे इतर राज्यांशी आपले संबंध निश्चित करण्याच्या गरजेतून त्यास आपले परराष्ट्रीय धोरण ठरवावे लागते. ‘धोरण’ या शब्दातून पूर्व-नियोजनाचा अर्थ ध्वनित होतो; परंतु अंतर्गत क्षेत्रातील आर्थिक किंवा सामाजिक धोरणापेक्षा परराष्ट्रीय धोरणाचे स्वरूप वेगळे असते.  

राज्यांतर्गत घटकांवर ज्या प्रमाणात राज्यकर्त्यांचे नियंत्रण असू शकते, त्यामानाने आंतरराष्ट्रीय समुदायाच्या घटकावंर, म्हणजे इतर राज्यांवर, त्याचे नियंत्रण अत्यल्प असते. त्यामुळे परराष्ट्रीय धोरण हे अनेक अनियंत्रित घटकांवर अवलंबून असते आणि म्हणून आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कोणत्याही राज्यास कालबद्ध तसेच योजनाबद्ध असे आखीव धोरण ठरविणे शक्य नसते. या दृष्टीतून परराष्ट्रीय धोरणाची तुलना स्वयंचलित जहाजापेक्षा नौकानयनाशी करता येण्यासारखी आहे. ज्याप्रमाणे प्रवाह, वारा, भरतीओहोटी इ. घटक लक्षात घेऊन इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी नाविक हा बाह्य परिस्थितीशी स्वतःस जुळवून घेतो, त्याप्रमाणे राज्यकर्त्यासही आपले ईप्सित साध्य करण्यासाठी, स्वतःच्या नियंत्रणाबाहेर असलेले अनेक घटक व वरचेवर घडणाऱ्या अकल्पित घटना लक्षात घेऊन आपल्या धोरणाची दिशा व डावपेच ठरवावे लागतात. अर्थात परराष्ट्रीय धोरण परिणामकारक होण्यासाठी त्यात एकसूत्रता आणि लवचिकपणा हे दोन्ही गुण आवश्यक असतात.  

इ.स.पू. चौथ्या शतकात कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात राजाने अंगीकारावयाच्या परराष्ट्रीय धोरणाबाबत चिकित्सा केली आहे. कौटिल्याच्या कल्पनेप्रमाणे राजाचे ध्येय आपल्या राज्याची वृद्धी करून साम्राज्य स्थापन करणे, स्वतः चक्रवर्ती होणे हे असावयास हवे. यासाठी अंगीकारावयाच्या धोरणाचे स्वरूप अर्थातच आधुनिक काळातील स्वतंत्र राष्ट्राशी संबंधित असणाऱ्या परराष्ट्रीय धोरणापेक्षा वेगळे आहे. कौटिल्याच्या धोरणास फार तर विस्ताराचे राजकारण म्हणता येईल. कौटिल्यप्रणीत धोरणाची उद्दिष्टे आधुनिक परराष्ट्रीय धोरणाच्या उद्दिष्टांपेक्षा काहीशी वेगळी असली, तरीही त्या धोरणाची रूपे, त्यासाठी लागणारी क्षमता आणि त्याची साधने यांची कौटिल्याने केलेली चर्चा विचारार्ह ठरते.  

राज्यविस्तारासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या पुढील सहा धोरणांची चर्चा कौटिल्य करतो : (१) संधी (स्नेहसंबंध), (२) विग्रह (संघर्ष), (३) आसन (तटस्थता), (४) यान (आक्रमण), (५) संश्रय (पराश्रय), (६) द्वैधिभाव (काही राज्यांशी युद्ध, तर काहींशी तह). या धोरणांचा वापर स्थलकालपरिस्थित्यनुरूप करावयाचा आहे. कौटिल्याने तीन प्रकारच्या शक्ती कल्पिल्या आहेत : मंत्रशक्ती (ज्ञान व धोरण यांवर आधारलेली), प्रभुशक्ती (आर्थिक व सैनिकी बळावर आधारलेली), उत्साहशक्ती (साहस व मनोधैर्य यावंर आधारलेली). यांचा उपयोग धोरण अंमलात आणण्यासाठी करावयाचा असे. कौटिल्याच्या मतानुसार धोरणाचे यशापयश या विविध शक्तींवर अवलंबून असते. त्याशिवाय धोरण राबविण्यासाठी चार पर्यायी उपायांची चर्चाही कौटिल्याने केली आहे. ते चार उपाय म्हणजे साम, दाम, दंड, भेद हे होत. राजनय, अर्थसाह्य, बल व प्रचार ही त्यांची आधुनिक रूपे म्हणता येतील आणि परराष्ट्रीय धोरणाची साधने म्हणून त्यांचा वापर होत असल्याचेही दिसून येते.  

एखाद्या देशाच्या परराष्ट्रीय धोरणाकडे पाहण्याच्या पारंपरिक दृष्टिकोणानुसार तेथील प्रस्थापित राज्यकर्त्या वर्गाची विचारसरणी, त्यांची मूल्ये यांचा अभ्यास केला जात असे. प्रत्येक देशाचे परराष्ट्रीय धोरण हे तेथील राज्यकर्त्या वर्गाच्या मूल्यांचे आणि विचारप्रणालीचे प्रक्षेपण असते. अशी समजूत त्याच्या मुळाशी आहे. या अर्थाने परराष्ट्रीय धोरणाचे वर्गीकरण लोकशाहीवादी, सर्वंकष सत्तावादी, उदारमदवादी, साम्यवादी, आक्रमणवादी असे करण्यात येई. या अर्थानेच इंग्लंडचे धोरण उदारमतवादी, तर दुसऱ्या महायुद्धापूर्वी जपानचे आणि सध्या चीनचे धोरण आक्रमणवादी आहे, असे सांगितले जाते. सर्वसाधारण जनतेची परराष्ट्रीय धोरणाकडे बघण्याची हीच दृष्टी असते. त्यामुळे एखाद्या अमेरिकेसारख्या लोकशाहीवादी देशाने पाकिस्तानसारख्या हुकूमशाही राष्ट्राशी सख्य करणे, रशियासासारख्या एखाद्या साम्यवादी राष्ट्राने चीनसारख्या दुसऱ्या साम्यवादी राष्ट्राच्या विरोधात उभे राहणे, हे त्यांना विसंगत वाटते. परराष्ट्रीय धोरणाकडे बघण्याचा हा धोपटमार्ग अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवतो. उदा., इंग्लंडमध्ये युद्धोत्तर काळात सत्ताधारी पक्ष अनेकदा बदलूनही परराष्ट्र-धोरण बदलले नाही. १९१७ मध्ये रशियात क्रांती होऊनही रशियाच्या परराष्ट्रीय धोरणाचे लक्ष्य फारसे बदलले, असे म्हणता येणार नाही.          

Similar questions