परदेशी परयटकाकडुन देशाल मिलणारया उत्पन्नाचे मार्ग
Answers
आजचे पर्यटक देशाच्या सीमा ओलांडून परदेशात मोठ्या संख्येने फिरत आहेत. याच पद्धतीने परदेशी पर्यटकही भारतात येतात. यामुळे पर्यटन क्षेत्राचा विकास होत आहे. मात्र, या क्षेत्रासमोरची आव्हानेही वाढली आहेत.आजचे पर्यटक देशाच्या सीमा ओलांडून परदेशात मोठ्या संख्येने फिरत आहेत. याच पद्धतीने परदेशी पर्यटकही भारतात येतात. यामुळे पर्यटन क्षेत्राचा विकास होत आहे. मात्र, या क्षेत्रासमोरची आव्हानेही वाढली आहेत. अलीकडेच जागतिक पर्यटनदिन साजरा झाला. त्यानिमित्त या क्षेत्राकडे एक नजर.
भूतलावरील स्वर्ग म्हणजेच काश्मीर एकदा तरी बघावा, नायगरा धबधब्याचा आवाज, त्याचे विराट रूप डोळ्यांत एकदा तरी प्रत्यक्ष साठवावे, अशी सुप्त इच्छा प्रत्येक पर्यटकाच्या मनात निश्चित असतेच. अर्थात पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक पर्यटन स्थळे जगभरात आहेत. 'जीवन में एकबार आना सिंगापूर' अशी साद सिंगापूर घालते, तर मायानगरी मुंबई जगभरातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. त्यातही भारतासारखा विविधतेत एकता जपणारा देश तर परदेशी पर्यटकांसाठी कायमच प्रथम पसंती राहिली आहे. यातही भारतातील प्राचीन संस्कृती, ऐतिहासिक स्थळे, समुद्रकिनारे याबरोबरच राजस्थानमधील पुष्करसारखे मेळे किंवा पुण्यातील गणेशोत्सवासारखा उत्सव असो या सगळ्यांबद्दल परदेशी पर्यटकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येते. आता पर्यटनाला एवढे महत्त्व आले आहे, की रोज नवनवीन पर्यटन क्षेत्रे विकसित होत असून पर्यटन विकास मंत्रालय किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या बरोबरच अन्य राज्यांतूनही पर्यटन स्थळे विकसित करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. दर वर्षी जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने विविध योजना राबवून पर्यटन क्षेत्राचा विकास करण्याबरोबरच पर्यटकांना विविध सुविधा मिळण्यासाठी; तसेच स्थानिकांना त्यातून रोजगाराच्या मोठ्या संधीही उपलब्ध करण्याचा प्रयत्न होताना दिसतो.कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत तेथील पर्यटनाची भूमिका महत्त्वाची असते. रसायने आणि इंधन यानंतर जगात पर्यटन या व्यवसायाचा तिसरा क्रमांक लागतो. निसर्गसौंदर्य न्याहाळत आनंदात काही क्षण घालविण्याची त्याबरोबरच नवनवीन कला, संस्कृतीविषयी जाणून घेण्यासाठी नवनव्या ठिकाणांचा शोघ घेऊन तेथे भेटी देण्याची माणसाची मूलभूत प्रवृत्ती हाच पर्यटनाचा मूळ आधार आहे. यामध्येही धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना पर्यटक प्रामुख्याने भेट देतात. जागतिक पर्यटन संघटनेच्या आकडेवारीनुसार मागील वर्षी १२० कोटी पर्यटकांनी जगभरातील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. व्यावसायिक दृष्टिकोनातून पर्यटन व्यवसायवाढीसाठी सरकारकडून किंवा खासगी व्यावसायिकांकडून नवीन ठिकाणे विकसित करण्यात येत असून, या क्षेत्राचा सातत्याने विस्तार होत आहे. त्यामुळे २०३० पर्यंत ही पर्यटकांची संख्या १३० कोटी होण्याचा अंदाज संघटनेने वर्तविला आहे. जगभरात २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने या क्षेत्रातील संधी आणि पर्यटन विकास मंत्रालय; तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत माहिती घेतली.
पर्यटन विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर मंत्रालयाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये मंत्रालयाकडून देशभरात विविध पर्यटन स्थळे विकसित करण्यावर भर देण्यात येत असून, पर्यटकांना अद्ययावत सुविधा आणि चांगली सेवा मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. भारतात पर्यटनासाठी येणाऱ्या परदेशी पर्यटकांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी त्यांना भारतीय संस्कृती समजून घेता यावी आणि प्रामुख्याने देशातील सांस्कृतिक परंपरांबद्दल आदार वाटावा या दृष्टीने पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पारंपरिकतेबरोबरच आधुनिकतेचा संगम घडवून आणण्यासाठी आणि या स्थळांच्या ठिकाणी; तसेच संबंधित शहरांमध्ये स्वच्छता राहण्याच्या दृष्टीनेही पर्यटन मंत्रालयाकडून व्यापक प्रमाणात प्रयत्न होताना दिसत आहेत.
Answer:
प्रदेशी पर्यटनकांकडून देशाला मिळणाऱ्या उत्पननाचे मार्ग