Parrots information in Marathi
Answers
अनेक प्रकारचे पोपट असतात. त्यातील मकाव पोपटांचे घरातील वास्तव्य कायम उत्साहवर्धक असते. ते आपल्या मालकाचे लक्ष कायम वेधून घेतात. घरातील इतर सदस्यांपेक्षा आपली खास ओळख निर्माण करतात. त्यामुळे मकाव पोपट सध्या जगभरातील पक्षीप्रेमींच्या पसंतीस पडत आहेत. श्वान किंवा मांजर या पाळीव प्राण्यांपेक्षा चपळ असणारा एखादा पाळीव पक्षी त्याच्या विशिष्ट गुणांमुळे लोकप्रिय ठरतो. मकाव पोपट हा त्यापैकीच एक. मकाव पोपट फार जुन्या काळापासून अस्तित्वात आहेत. मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या जंगलात मकाव पोपट आढळतात. घनदाट जंगलात या मकाव पोपटांचे अधिकाधिक वास्तव्य पाहायला मिळते. लाकूडतोड करताना काही लाकूडतोडय़ांच्या नजरेस हे मकाव पोपट पडले. यानंतर या पोपटाला जगभरातून मागणी वाढू लागली. अलीकडे जंगलतोडीमुळे या मकाव पोपटाच्या अनेक जाती लुप्त झाल्याचे निदर्शनास येत आहे. विशिष्ट आकार आणि रंगामुळे मकाव पोपट पक्षीप्रेमींच्या अधिक पसंतीस पडतात. सध्या एक ते दीड लाख रुपये किंमतीपासून बाजारात मकाव पोपट उपलब्ध असल्याचे श्रीमंताचे मकाव अशी ओळख या पक्ष्याला प्राप्त झाली आहे. मोठे डोके आणि आकर्षक रंगामुळे हा पक्षी लक्ष वेधून घेतो. या पोपटाच्या ब्लू गोल्ड, ब्लू थ्रोटेड, ग्रीन विंग, हॅकिंथ, मिलेटरी, रेड फ्रंट हेड, कार्लेट अशा वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. कार्लेट आणि ब्लू गोल्ड ही प्रजात अधिक लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे मकाव पक्ष्याला साधारण पन्नास वर्षांपर्यंत आयुष्य लाभले आहे.
HOPE IT HELP YOU
PLZ MARK AS BRAINLIST
☺️☺️