Paryavan samtol aani corona essay in Marathi
Answers
पर्यावरण समतोल आणि कोरोना
कोरोना या महामारी मुळे सध्या जगात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे , कोरोना हे एक जैविक विषाणू असून त्याचे उगमस्थान चीन आहे सूत्रा़नुसार हे कळाले आहे की या विषाणूंचा प्रादुर्भाव वटवाघुळ या प्राण्याच्या चरबी मधून झाला चीन या देशात वटवाघुळ मांजर कुत्र उंदीर साप हे प्राणी मारून खाणे हे सामान्य मानले जाते , जगभरात या रोगांचे मरीज वाढतच चालले आहेत या रोगावर आतापर्यंत कोणतीही लस अजून निघालेली नाही हा रोग संसर्गजन्य असून एखाद्या कोरोणाच्या रोगी व्यक्ती च्या संपर्कात आल्यास आपल्यालाही हा रोग होण्याची संभाव्यता असते . या रोगामुळे जीवित तसेच वित्तहानी झालेली ही दिसून येते वस्तू व मालमत्तेची आयात-निर्यात कमी होऊन जगभरात काही प्रमाणात महागाई वाढलेली दिसून येते .
पण या रोगराईला कुठेतरी आपणच कारणीभूत आहोत असे दिसून येते कारण प्राण्यांची हत्या करून निसर्गाचा समतोल आपण बिघडवत चाललेलो आहोत , प्रत्येक प्राण्याची विविध वैशिष्ट्ये व गुणधर्म असतात जेणेकरून निसर्गाचा समतोल राखण्यात ते आपले योगदान पार पाडतात पण आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आपण त्यांची हत्या करून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे काम करत आहोत कारण निसर्गाचा समतोल राखणे ही एक अत्यंत महत्त्वाची गरज आहे .