Hindi, asked by lalita1049, 1 year ago

Paryavaran Diwas wrruttantlekhan​

Answers

Answered by krishnakesarwani123
1

Answer:

PLEASE check your question

Attachments:
Answered by chery3106
3

Answer:

Here is your answer mate

Explanation:

5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस मानला जातो. पर्यावरणात जर आम्ही समतोल राखला तर मानव जात सृष्टीत टिकून राहिल. पर्यावरण म्हणजे पृथ्वीवरील आणि पृथ्वीभोवतालच्या वातावरणाचा समतोल. हा समतोल राखण्यात वृक्ष, झाडे आम्हाला खूप मदत करतात म्हणूनच भारतीय संस्कृतीमधील वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या वृक्षांची, रोपांची पूजा करण्याची परंपरा खूप दूरदृष्टीची म्हणावी लागेल.

रोज संध्याकाळी तुळशीला पाणी घालून तिच्याजवळ दिवा लावायचा, वडपौर्णिमेला मोठमोठ्या पारंब्या असणाऱ्या झाडाची पूजा करायची या आणि अशा रीतीने वृक्षांचे जतन होते. पर्यावरणाचा समतोल साधतो. झाडे कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात, ऑक्सिजन बाहेर फेकतात आणि ग्लोबल वॉर्मिंग पासूनही आम्हाला हे वृक्ष वाचवतात. एकाच ठिकाणी उभी राहणारी झाडे उन, वारा, पाऊस सहन करतात आणि औषधी सुद्धा आम्हाला हे वृक्ष देतात.

पक्षी, प्राणी, कृमी असे अनेक विविध झाडांच्या आश्रयाने राहतात. ऑक्सीजन म्हणजे प्राणवायूचे हे जणू कारखाने आहेत. झाडे वाचली तर पर्यावरण सुरक्षित राहिल आणि पर्यावरण आमचे म्हणजे मानवजातीचे रक्षण करील म्हणून जंगलाचे रक्षण आम्ही केले पाहिजे. ही जंगले तयार व्हायला हजारो वर्षांचा काळ जावा लागला पण जंगले तोडायला मात्र अगदी थोडे दिवस पुरतात हे आम्ही विसरत आहोत.

Hope it helps :)

Similar questions