पश्चिम किनारी प्रदेशात जास्त विस्ताराची सपाट मैदाने कमी आहेत भौगोलिक कारण सांगा का कमी आहे सपाट मैदानी
Answers
भारत देशाचे भौगोलिक दृष्ट्या हिमाच्छादित पर्वत (हिमालय), वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात. भारत भौगोलिक दृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे.[१]
भारताचा भौगोलिक नकाशा.
भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन या महाखंडाचा भाग होता. पृष्ठीय बदलांमध्ये भारतातील पृष्ठ वेगळे झाले व ईशान्य दिशेला वेगाने सरकू लागले. साधारणपणे ५ कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ आशियाई पृष्ठाला धडकले यामुळे भारताच्या उत्तर व इशान्य भागात हिमालयाची निर्मिती झाली. [१] भारतीय पृष्ठ व अशियाई पृष्ठामधील भागात जो समुद्र होता तो दलदलीचा भाग बनला व नंतर हळूहळू नद्यांनी आणलेल्या गाळाने या भाग मैदानी बनवला. आज हा भाग गंगेचे खोरे म्हणून ओळखला जातो. [२] [३] गंगेच्या खोर्याच्या पश्चिमेकडे अरावली पर्वताची रांग आहे. अरावली पर्वत हा जगातील सर्वात प्राचीन पर्वतामध्ये गणला जातो.अरावलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे थारचे वाळवंट तयार झाले आहे. [४] पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज भारतीय द्वीपकल्प म्हणून् ओळखले जाते. यात दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा, मध्यप्रदेशातील मोठा भूभाग, छोटा नागपूर पठार इत्यादी भूभाग येतो. [५] दख्खनचे पठाराला समुद्री किनाराला समांतर असे सह्याद्री व पूर्व घाट असे कडे आहेत. दख्खनचे पठार सह्याद्री हे सर्व ज्वालमुखीपासून निर्माण झालेले असून त्यात भूप्रस्तराचे मूळ फॉर्मेशन आहेत. दगडांचे काही नमुने १०० कोटी वर्षांपेक्षाही अधिक आहे.[६] भारताला एकूण ७,५१७ किलोमीटर (४,६७१ मैल) किमी इतका समुद्रकिनारा लाभला आहे त्यातील ५,४२३ किलोमीटर (३,३७० मैल) इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित २,०९४ किलोमीटर (१,३०१ मैल) द्विपसमूहांमध्ये समाविष्ट आहे.[७] भारतीय नौदलीय सांख्यिकीनुसार मुख्यभूमीमधील समुद्रकिनाऱ्यामध्ये ४३ टक्के वाळूचे किनारे आहे, ११ टक्के खडकाळ तर उर्वरित ४६ टक्के दलदलींनी भरलेला आहे.[७]
बहुतांशी हिमालयीन नद्या या गंगा व ब्रम्हपुत्रा या नद्यांना मिळतात. या दोन्ही नद्या बंगालच्या उपसागराला जाउन मिळतात. [८] गंगेच्या मुख्य उपनद्यांमध्ये यमुना, कोसी, गंडकी इत्यादी आहेत. हिमालयातून जेव्हा सपाट प्रदेशात वाहू लागतात तेव्हा या नद्या मोठा पूर येण्याची शक्यता असते. दख्खनच्या पठारावरील मह्त्वाच्या नद्यांमध्ये गोदावरी , कृष्णा, भीमा, महानदी, कावेरी, तुंगभद्रा इत्यादी महत्त्वाच्या नद्या आहेत ज्या बंगालच्या उपसागराला मिळतात्. मध्य भारतातून नर्मदा सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे जी अरबी समुद्राला जाऊन मिळते.[९] [१०] पश्चिम भारतात कच्छ येथे पृष्ठीय बदलांमुळे खार्यापाण्याची दलदल आहे त्याला कच्छचे रण असे म्हणतात. गंगा नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते तिथे त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे. [११]. भारताच्या मुख्य भूमीपासून दूर दोन द्विपसमूह भारताच्या अधिकारात येतात. दक्षिण अरबी समुद्रातील लक्षद्विप व बंगालच्या उपसागरातील बर्मा व इंडोनेशियाजवळील अंदमान आणि निकोबार. [१२]
भारतीय हवामान हे हिमालय व थारचे वाळवंटाने प्रभावित आहे. हिमालय उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखून धरतो तर थारचे वाळवंट आणि हिमालय हे दोघेही भारतात मोसमी पाऊस पडण्यास जवाबदार आहेत. थारचे वाळवंट दक्षिणेकडील हिंदी महासागरातून बाष्प आकर्षित करते, या प्रभावामुळे मोसमी वारे वाहतात. जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये नैऋत्य मोसमी वार्यांमुळे संपूर्ण भारतभर पाउस पडतो तर इतर वेळ कोरडे हवामान असते. [१३] हिमालय कोरडे थंड वारे रोखून धरतो त्यामुळे भारताचे हवामान वर्षभर उष्ण असते. अगदी कडक हिवाळ्याच्या महिन्यातही दिवसाचे सरासरी तापमान जास्तच असते. [१४][१५] [१३] ढोबळमानाने चार विविध प्रकारचे हवामान भारतात आढळून येतात विषवृतीय आद्र हवामान, विषवृत्तीय शुष्क हवामान, समविषववृतीय आद्र हवामान व हिमालयीन प्रकारचे हवामान. [१६]