India Languages, asked by Rudra788, 10 months ago

पशु पक्ष्यांचे संवर्धन ही काळाची गरज... यावर बातमी लेखन करा

Answers

Answered by Anonymous
4

Explanation:

-पक्षीधन’ वर्गात गाय, म्हैस, शेळी, मेंढी, डुक्कर, उंट, गाढव, घोडा, याक, मिथुन, कोंबडी, बदक, क्वील, खेचर अशा विविध प्राण्यांचा व पक्ष्यांचा समावेश होतो. या पशु-पक्ष्यांपासून मिळणार्‍या उत्पादनात खूप विविधता आहे. हे पक्षी अगदी लहान असल्यापासून मोठे होईपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे मानवाला उत्पादन देत असतात. पक्षीवर्गीयांच्या अंड्यापासूनही उत्पादन मिळत असते. त्यामुळे उपजीविकेच्या दृष्टिकोनातून ‘पशु-पक्षीधना’कडे पाहणे काहीच गैर नाही. यासंदर्भात ग्रामीण भागाचे उदाहरण घेतले, तरी शेतजमीन नसणार्‍या (पण मोलमजुरी करून पोटापाण्याची सोय करू पाहणार्‍या) कुटुंबापासून ते एक-दोन एकर शेतजमीन असलेली कुटुंबे व त्याहून मोठे शेतकरी ज्यांना बागायतदार ते ‘बडे बागायतदार’ अशी बिरुदावली लावता येते, अशा कुटुंबांकडेसुद्धा ‘पशु-पक्षीधन’ दिसून येते. त्याचप्रमाणे लहान-मोठे प्लॉट असलेले, ज्यात एक ते दोन गुंठ्यापासून 5 ते 10 गुंठे जमीन असणार्‍या कुटुंबांकडेसुद्धा जास्त आमदनी मिळविण्याकरिता दोन-तीन गायी/म्हशी व 100 ते 200 बॉयलर कोंबड्या/ बदके पाळलेली असतात. ग्रामीण भागातील कुटुुंबांकडे ‘एकात्मिक पद्धतीचे पशु-पक्षी’ असतात. या पद्धतीत एक-दोन गायी/म्हशी, चार-पाच शेळ्या, 15-20 कोंबड्या तसेच व्यवसायाच्या जमातीनुसार चार-पाच डुकरे, तर वेगवेगळ्या राज्यात त्यांच्या हवामानानुसार/ गरजेनुसार ‘पशु-पक्षीधना’ची जोपासना केलेली असते. जसे- राजस्थानमध्ये उंट, उत्तर-पूर्व राज्यांमध्ये मिथून, हिमाचल व वरच्या भागात याक वगैरे. मात्र, गाय, म्हैस, मेंढ्या, कोंबड्या हे प्राणी सगळीकडे पाळले जात असल्याचे आणि त्यांच्यावर कुटुंबाची उपजीविका होत असल्याचे दिसून येते.

Similar questions