History, asked by garvagarwal2251, 5 months ago

passage writing in marathi

Answers

Answered by anshikakumari32
0

Answer:

Essay on Diwali in Marathi हा निबंध आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या शब्दांत लिहून देणार आहोत. तुम्ही यापैकी कोणताही निबंध तुमच्या परीक्षेमध्ये वापरू शकता.

दिवाळीचा सण म्हणजे असत्यावर सत्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाचा विजय होय. हा सण केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीकच नाही तर त्याचे सामाजिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि आर्थिक महत्त्व देखील आहे. हा सण सामाजिक ऐक्य वाढवण्याचे काम करतो.

Essay on Diwali in Marathi

दिवाळी वर १० ओळीत मराठी निबंध 10 lines on Diwali

दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे.

दिवाळीचा सण हा हिंदू धर्माचा मुख्य सण आहे आणि हा प्रकाशाचा सण आहे.

दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम १४ वर्षांच्या वनवासातून परत आले होते.

प्रभू श्रीराम यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील लोकांनी घरात दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला होता, ही परंपरा आजही कायम आहे.

दिवाळीचा सण 5 दिवस म्हणजे धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, गोवर्धन पूजा (पाडवा) आणि भाऊबीज अशा प्रकारे साजरा केला जातो.

दिवाळी सुरू झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी लक्ष्मी पूजन असते, हा दिवस म्हणजे दिवाळी सणाचा मुख्य दिवस असतो.

दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी, सरस्वती आणि गणपतीची पूजा केली जाते.

दिवाळीच्या दिवशी घरे व कार्यालये दिवे व रांगोळीने सजवली जातात, लोक एकमेकांना फराळ आणि मिठाई देतात.

दिवाळीच्या दिवशी लोक नवीन वस्तू खरेदी करतात, नवीन कपडे परिधान करतात..

निराशेवर आशेचा विजयोत्सव म्हणून दिवाळी साजरी केली जाते.

Similar questions