पत्र लेखन
क्रिडांगणाचे आत्मवृत्त
*
ओस क्रिमन खंत
क्रिडारणाची मुले
मुळे इतर क्रिडांगे
प्रीडांगणावर भीष्टीत
वारज
मजाव्यागमन.
कारणे
(अभ्यास,
मोबाईल,
पूरक्शन,
शिकवी
Answers
Explanation:
उत्तर : शाळेच्या क्रीडा स्पर्धा सुरू होत्या. आपापल्या समूहात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू होती. आमच्या समूहाचा कबड्डी सामना सुरू व्हायला अजून बराच अवकाश असल्याने मी क्रीडांगणाच्या एका कोपऱ्यात उभा राहून निरीक्षण करीत होतो. इतक्यात मला भास झाला की मला कुणीतरी आवाज देत आहे. कुणीतरी माझ्याशी बोलत आहे.
अरे बाळा! तू किती बारकाईने मला बघत होतास. मला खूप आनंद वाटला. हो. मी क्रीडांगण बोलतोय! थोड्याच वेळात तुमच्या स्पर्धा सुरू होतील. तुम्ही आनंदाने माझ्या अंगावर हुंदडाल. तुम्ही मुले माझ्या अंगाखांद्यावर उड्या मारत मोठे होता. मी तुमचं बालपण पाहतो तेव्हा मला खूप आनंद होतो. तुम्ही जेव्हा विविध खेळांचा सराव करता तेव्हा खरंतर माझी पाठ खूप दुखते. माझे संपूर्ण शरीर दुखू लागते. पण मला याचे मुळीच दुःख होत नाही. कारण माझे अस्तित्वच तुम्हा मुलांच्या निरोगी आयुष्यासाठी आहे. तुमच्या सुदृढ शरीरासाठी माझे असणे फार महत्त्वाचे आहे. माझ्यामुळेच तुम्हाला अनेक मैदानी खेळ खेळणे शक्य होते. ज्यामुळे तुमचे शरीर लवचीक बनते. आरोग्य चांगले राहते. 'निरोगी शरीरातनिरोगी मन वसत असते.' पण आज मात्र शालेय स्पर्धा वगळल्यातर तुम्ही मुले माझ्याजवळ फिरकतही नाही. टीव्हीच्या रंगीत दुनियेतहरवून गेले आहात त्यामुळे तुम्हाला माझी आठवणही येत नाही.पूर्वी शाळा सुटली की तुम्ही मुलं माझ्या भेटीला यायचा. दिवाळीची सुट्टी असो वा उन्हाळ्याची माझ्यासोबत दिवसभर तुमचा दंगा सुरू असायचा. आजची स्थिती मात्र बदलली आहे. माझ्या मऊशार मातीचा स्पर्श तुमच्या अंगाला होतच नाही. दप्तराच्या ओझ्यात तुम्ही दबून गेला आहात. शरीर संपत्ती किती महत्त्वाची असते याचा जणू सगळ्यांनाच विसर पडलाय की काय असे वाटते.
माझेही आता वय झाले आहे. माझ्यातले चैतन्य आता कमी होत आहे. म्हणूनच की काय माझ्या भोवताली आता वेगवेगळी खाऊची लहान मोठी दुकाने उभी राहू लागली आहेत. तिथे संध्याकाळी बरीच गर्दी जमू लागते. मी हताश होऊन सगळं बघत राहतो. एरव्ही खेळाच्या पांढऱ्या आखीव-रेखीव सीमांनी शोभिवंत दिसणार माझ शरीर कचऱ्याने मलीन होतं. माझी सगळी रया निराशेतच रात्र काढतो. सकाळी पुन्हा माझे कान तुम्हा मुलांचा बदलून जाते. किलबिलाट ऐकण्यासाठी उत्सुक होतात. तुमचे खेळ बघण्यासाठी, तुमच्या आनंदासाठी सज्ज होतो.
बाळांनो! निरोगी आरोग्य हे स्वतः कमवावे लागते. त्यासाठी मैदानी खेळ निश्चितच मदत करतील. मी तुमच्या सुखासाठी सदैव तुमच्या झाला होता. सोबत आहे. बोलता, बोलता आवाज बंद