पत्रलेखन 5 marks
विषय= तुमच्या शाळे समोरील रस्ता खराब असल्याची तक्रार तुमच्या शहरातील महानगरपालिकेच्या बांधकाम अधिकाऱ्याला विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने करा.
Answers
Answered by
7
पत्रलेखन
Explanation:
प्रति,
माननीय मुख्य बांधकाम अधिकारी,
पुणे महानगरपालिका.
विषय: शाळेसमोरच्या खराब रसत्याची तक्रार करणारे पत्र.
सन्माननीय महोदय,
मी, अ. ब.क, म्हात्रे विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हे पत्र लिहत आहे. पत्र लिहीण्यामागचे कारण की आमच्या शाळेच्या समोरच्या रसत्याची परिस्थिती खूप वाईट झाली आहे.
या रस्त्यावर बरेच खड्डे झाले आहेत. पावसाळ्यात या खड्यांमध्ये पाणी जमा होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना व लोकांना खूप त्रास होत आहे.
गेल्या आठवड्यात या खड्यामध्ये एक सायकल चालक पडला व त्याच्या पायाला गंभीर जखम झाली.
मी तुम्हाला नम्र विनंती करतो की आपण लवकरात लवकर या रसत्याला दुरुस्त करावे.
कळावे,
आपला विश्वासु,
अ. ब.क
विद्यार्थी प्रतिनिधी,
म्हात्रे विद्यालय,
पुणे.
दिनांक: ११ जून,२०२१
Similar questions