India Languages, asked by luckysk20, 26 days ago

१. पत्रलेखन
खालील सूचनाफलक वाचा व कृती सोडवा.
वनराई संस्थेने चालवलेली
वृक्षवल्ली नर्सरी
स्वस्त दरात रोपं उपलब्ध
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
नर्सरीतून शाळेतील
वृक्षलागवडीच्या
कार्यक्रमाकरता काही रोपांची
मागणी करणारे पत्र लिहा​

Answers

Answered by sidhantghuge12
17

दिनांक: ४ जून २०१९

प्रति,

माननीय संचालक

हिरवाई ट्रस्ट,

बालोद्यान मार्ग,

तळेगाव दाभाडे.

विषय: 'वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत.

माननीय महोदय,

मी अ.ब.क, स्वामी दयानंद शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपणांस हे पत्र लिहीत आहे. 'जागतिक पर्यावरण दिनानिमित्त' दिनांक ५ जून २०१९ रोजी हिरवाई ट्रस्ट 'झाडे लावा ... झाडे जगवा' हा उपक्रम राबवणार असल्याचे कळले. या उपक्रमात औषधी वनस्पतींच्या, फुलांच्या, फळांच्या रोपांचे मोफत वाटप होणार आहे. आमच्या स्वामी दयानंद शाळेच्या मोकळ्या मैदानात व शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्याची आमची इच्छा आहे. 'झाडे लावा, झाडे जगवा' या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात आम्हांला खारीचा वाटा उचलायचा आहे.

यासाठी आपणाकडे उपलब्ध असलेल्या विविध रोपांचे प्रकारांनुसार प्रत्येकी ३ नग आपण पाठवून द्यावेत, जेणेकरून शाळेच्या परिसरात विविध झाडांची लागवड केली जाईल.

आमच्या विनंतीला मान देऊन आपण आम्हांस या स्तुत्य उपक्रमात सहभागी करून घ्याल, अशी आशा वाटते. त्याकरता आपण ही रोपे लवकरात लवकर शाळेच्या पत्त्यावर पाठवून द्यावीत ही नम्र विनंती.

कळावे,

आपली विश्वासू,

अ.ब.क.

विद्यार्थी प्रतिनिधी

स्वामी दयानंद शाळा,

पेशवे रोड,

पुणे.

[email protected]

Similar questions