*पत्रलेखन*
मोठ्या भािाला वाढवदिसावनवमत्त शुभेच्छा देणारेपत्र वलहा.
Answers
Answered by
1
मोठ्या भावाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे पत्र लिहा
दिनांक: १२ जानेवारी २०२२
प्रिय दादा,
सप्रेम नमस्कार.
दादा, तुला तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
ईश्वर तुला प्रत्येक कार्यात यश देईल अशी प्रार्थना करते.
दादा ,आशा करते तु तिकडे आनंदात असशील .
मागच्या वर्षी तुझा वाढदिवस सर्वांनी मिळून साजरा केला होता . यावर्षी ते शक्य नसल्यामुळे तुला पत्राद्वारे शुभेच्छा देत आहे.मी तुझ्यासाठी भेट सुद्धा पाठवत आहे. ती तुला खुप आवडेल.
आईबाबांच्या तुला आशिर्वाद आणि शुभेच्छा आहेत.
तु स्वतः ची काळजी घे.तब्येतीला जप.तुझ्या भावी वाटचालीसाठी तुला खुप खुप शुभेच्छा!
तुझी बहिण ,
अ.ब.क.
पत्ता:
आदर्श वसतिगृह ,
१४१०, सुंदरबाग ,
तुलसी वन, पुणे-४११ ००४
संपर्क : ९१××××××××
ई- मेल : [email protected]
Similar questions