पत्रलेखन:'स्वच्छता हीच देशसेवा'स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रमदि. २ ऑक्टोबर, सकाळी १०.०० वाजताशालेय परिसर स्वच्छताविद्यार्थी प्रतिनिधी या नात्यानेउपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
Answers
Answer:
please make me as brain list
Explanation:
गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज “स्वच्छता हीच सेवा” या अभियानाची सुरवात केली.
स्वच्छता मोहिमेला मिळणारा प्रतिसाद वाढवणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या स्वच्छ भारत अभियानाच्या ४थ्या वर्धापन दिनी या मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे, जी गांधीजींची 150 वी जयंती असेल. पंतप्रधानांनी सर्वांना या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छ भारत निर्माण करण्यात आपला सहभाग देण्याचे आवाहन केले.
या निमित्ताने पंतप्रधानांनी देशभरातील 17 विविध ठिकाणांवरील लोकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला.
यावेळी पंतप्रधानांनी या अभियानातील आजवरच्या कामगिरीचे वर्णन केले ज्यामध्ये 4 वर्षात 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 450 जिल्ह्यांना हागणदारीमुक्त करण्याचा उल्लेख होता. पंतप्रधान पुढे म्हणाले की, केवळ शौचालय आणि कचराकुंड्यांचा पुरवठा करून भागणार नाही तर स्वच्छतेची सवय अंगी बाळगायला हवी. देशभरातील जनतेच्या सहभागाचा यावेळी पंतप्रधानांनी उल्लेख केला.
आसाममधील दिब्रुगढ येथील शालेय विद्यार्थ्यांनी यावेळी पंतप्रधानांना त्यांनी शाळा आणि परिसरात केलेल्या स्वच्छतेची माहिती दिली. पंतप्रधानांनी या बालकांचा स्वच्छतादूत असा उल्लेख करून त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.
गुजरात मधील मेहसाना येथील दुध आणि कृषी सहकारी संस्थांच्या सभासदांनी यावेळी पंतप्रधानांना त्यांनी केलेल्या स्वच्छता कार्याशी अवगत केले. स्वच्छतेमुळे अतिसारासारख्या रोगांना आळा बसत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
मुंबईतून श्री अमिताभ बच्चन यांनी,ते सहभागी झालेल्याविविध स्वच्छता मोहिमांची पंतप्रधानांना माहिती दिली, ज्यामध्ये मुंबईच्या समुद्रकिनारा स्वच्छतेचाही उल्लेख होता. प्रसिद्ध उद्योगपती श्री.रतन टाटा यांनीही स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले. पंतप्रधानांनी यावेळी खासगी क्षेत्राकडून स्वच्छता मोहिमेत भरीव कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.
नोएडा येथून दैनिक जागरणच्या संजय गुप्ता आणि इतर वरिष्ठ पत्रकारांनी यावेळी त्यांनी केलेल्या स्वच्छता कार्याची माहिती दिली. लडाख येथील पँगोंग येथून आयटीबीपीच्या जवानांशीसंवाद साधला आणि पंतप्रधानांनी त्यांचे देशसेवेबद्दल कौतुक केले.
कोइम्बतुर येथून सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी या मोहिमेबद्दल लोकांच्या मनात उत्साह आहे जो त्यांना त्यांच्या प्रवासात सतत जाणवतो असे सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी ‘ही’ सरकार अथवा पंतप्रधानांची मोहीम नसून पूर्ण देशाची मोहीम आहे असे सांगितले.
छत्तीसगढमधील दंतेवाडा तर तमिळनाडूमधील सेलम येथून महिला सत्याग्रहींनी पंतप्रधानांना त्यांनी केलेल्या स्वच्छता कार्याची माहिती दिली. पटनासाहिब गुरुद्वारा तसेच माउंट अबू येथून अध्यात्मिक गुरूंनी पंतप्रधानांशी संवाद साधला. त्यांचा व संस्थांमधील ब्रम्हकुमार यांचा पंतप्रधानांनी गौरव केला. मध्य प्रदेशमधील राजगढ, उत्तर प्रदेशमधील फतेपूर येथील नागरिकांनी तसेच बेंगलोर मधून अध्यात्मिक गुरु श्री श्री रवी शंकर यांनीही पंतप्रधानांशी संवाद साधला.
बिजनौर येथील गंगा स्वच्छता स्वयंसेवकांचे पंतप्रधानांनी माँ गंगेच्या स्वच्छतेबद्दल कौतुक केले. तसेच या कार्यात सहभागी होण्यासाठी गंगेकाठ्च्या सर्व नागरिकांना आवाहन केले. अजमेर शरीफ दर्गा येथील श्रद्धाळू, हरियानातील रेवाडी येथील रेल्वे कर्मचारी आणि कोल्लमहून माँ अमृतानंदमयी यांनीही पंतप्रधानांशी संवाद साधला.
पंतप्रधानांनी या सर्व स्वछ्ताग्रहींच्या ऐतिहासिक कार्याचे शेवटी कौतुक केले आणि स्वछ्तेप्रती आपणा सर्वांची निष्ठा आभाळाएवढी असल्याचा उल्लेख केला.