India Languages, asked by vritesh328, 28 days ago

पत्रलेखन शाळेत 'स्वच्छता सप्ताह' साजरा करण्यासाठी लागणाऱ्या स्वच्छता साहित्याची मागणी करणारे पत्र तुमच्या शाळेतील वरिष्ठ सेवकांना करा.

Answers

Answered by Sauron
83

उत्तर :

पत्रलेखन (औपचारिक)

__________________

दिनांक : 09 एप्रिल, 2021

प्रति,

माननीय वरिष्ठ सेवक,

श्री शिवाजी विद्यालय,

मराठा चौक,

पुणे .

विषय : स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणेबाबत.

महोदय,

मी गौरी देशमुख शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास पत्र लिहीत आहे की, आपल्या शाळेत गांधी जयंती निमित्त स्वच्छता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. स्वच्छता सप्ताह 2 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या दरम्यान होणार आहे. परंतु या कार्यासाठी लागणारे साहित्य, उपकरण यांची कमतरता आढळून आली आहे. विद्यार्थ्यांना या साहित्याची गरज आहे. कृपया आपण लवकरात लवकर याची व्यवस्था करावी. सामानाची / साहित्याची यादी खालील प्रमाणे आहे :

1). झाडू - 10 नग

2). टोपली - 20 नग

3). कुदळ - 5 नग

4). खुरपे - 10 नग

5). फावडे - 10 नग

अपेक्षा करते वरील सामान आपण वेळेवर द्याल.

तसदीबद्दल क्षमस्व. धन्यवाद

आपली विश्वासू,

गौरी देशमुख,

(विद्यार्थी प्रतिनिधी),

श्री शिवाजी विद्यालय,

पुणे.

__________________

Similar questions