. *पत्रलेखन तुमच्या शाळेमध्ये दिवाळी सुट्टीत 'हस्ताक्ष सुंदर करूया!' हे तीन दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा. *
Answers
उत्तर :
★ पत्रलेखन :
___________________________
दिनांक : 28 ऑक्टोबर, 2021
प्रति,
मा. श्री. अभिमन्यू देशपांडे
वर्गशिक्षक, इयत्ता 10 वी (अ)
विखे पाटील स्कूल
पुणे - 422009
विषय : 'हस्ताक्षर सुंदर करूया!' या शिबिरामध्ये सहभागी करून घेण्याबाबत.
महोदय,
मी गौरी देशमुख इयत्ता 10 (अ) मध्ये शिकत असून, सूचना फलकावर देण्यात आलेली सूचना पाहिली यामुळे मला समजले की आपल्या शाळेमध्ये दिवाळी सुट्टीत 'हस्ताक्षर सुंदर करूया!' हे तीन दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 1 नोव्हेंबर ते 3 नोव्हेंबर या दरम्यान होणाऱ्या या 3 दिवसांच्या शिबिरामध्ये सहभागी होण्याची माझी मनापासून इच्छा आहे.
'हस्ताक्षर सुंदर करूया!' या शिबिरामध्ये सहभागी होऊन याचा अधिकाधिक फायदा करून घेण्यासाठी मी प्रयत्न करेन. त्यासाठी मी आपणास विनंती करते की मला या शिबिरामध्ये सहभागी करून घ्यावे.
मला आशा आहे की, आपण मला संधी द्याल.
धन्यवाद
आपली विश्वासू
गौरी देशमुख
इयत्ता 10 वी (अ)
विखे पाटील स्कूल
पुणे - 422009
___________________________