पतित पावन मंदिरांची निर्मिती यांनी केली -
Answers
Explanation:
हे शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सावरकरांना पतित पावन मंदिर उद्घाटन समारंभाचे निमंत्रण मिळाल्यावर पाठवलेल्या अभिप्रायातील आहेत. रत्नागिरीतील १९२४ ते १९३७ या स्थानबद्धतेच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जातिभेदांविरोधात हत्यार उगारले. पतित पावन मंदिर हे त्याच संघर्षाचं फलित आहे. भागोजीशेठ कीर यांच्या मदतीने ३ लाख रुपये खर्च करून सर्व जातीतील लोकांना खुले असे हे पतितपावन मंदिर निर्माण केले गेले. मंदिरात लक्ष्मीनारायणाची अतिशय सुंदर मूर्ती आहे. इथं कोणत्याही जातीच्या माणसाला अगदी गर्भगृहापर्यंत जाऊन पूजा करता येते.
मंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकर, शंकराचार्य कुर्तकोटी, समर्थ रामदास आणि गाडगेबाबा यांची सुंदर चित्रे आहेत. सणासुदीला इथं भक्त रांगोळ्यांनी उत्तम सजावटही करतात. २० हजार चौरस फूट जागेत बांधलेलं हे मंदिर २२ फेब्रुवारी १९३१ रोजी भागोजीशेठ कीर आणि त्यांच्या पत्नीने लोकार्पण केलं. सर्व ज्ञातीतील लोकांचे इथं क्रांतिकारी सहभोजन झाले. यात दीड हजार लोक सामील झाले. काळाराम मंदिर सत्याग्रहानंतर एका वर्षाने ही घटना घडली. इथं सर्वजातीय महिलांचेही सहभोजन झाले. कोल्हापूर येथील सत्यशोधक समाजातील श्री माधवराव बागल यांच्या पत्नीने त्याचे नेतृत्व केले.
Answer:
हे मंदिर १९३१ मध्ये भागोजी शेठ कीर यांनी स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या सांगण्यावरून बांधले.