Science, asked by vridhibhatia860, 1 year ago

पदार्थाचे वस्तुमान m असून तो v या वेगाने जात असल्यास गतिज ऊर्जेचे सूत्र तयार करा.

Answers

Answered by Aditya431709
5

speed=distance/time

it is formula for finding speed

Answered by gadakhsanket
10

★उत्तर - असे समजा m या वस्तुमानाची एक वस्तू एका जागेवर स्थिर आहे, या वस्तूला बल लावल्यामुळे ती वस्तू गतिमान झाली.u हा तिचा सुरवातीचा वेग आहे .त्या वस्तूवर f एवढे बल लावले आहे.बल लावल्याने a एवढे त्वरण निर्माण झाले व t कालावधीनंतर तिचा अंतिम वेग v एवढा झाला.या कालावधीत तिचे झालेले विस्थापन s आहे, म्हणून वस्तूवर झालेले कार्य w

w = f×s

न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार

f =ma.......(1)

न्यूटनचे गतीविषयक दुसरे समीकरण वापरून

s =ut+1/2at^2

परंतु आरंभिक वेग शून्य असल्याने u =0

s = 0+1/2at^2

s =1/2at^2 ......(2)

∴ w=ma×1/2at^2

समीकरण (1) व (2) वरून

w =1/2m (at)^2 .....(3)

न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या समीकरणावरून

v=u+ at

∴ v = 0 +at

∴v = at

∴ v^2 = (at)^2 ...(4)5

∴ W=1/2mv^2

समीकरण(3) व (4) वरून वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा म्हणजेच त्या वस्तूवर झालेले कार्य होय.

∴ K. E.=W

∴ K. E.= 1/2mv^2

धन्यवाद....

Similar questions