Hindi, asked by theharsh6215, 11 months ago

Patra lekhan in Marathi tumcha Mythri Mitra Mitra Neela swimming Madhya pahla kramank Patra liha please help me i don't know marathi

Answers

Answered by halamadrid
33

■■तुमच्या मैत्रिणीला स्वीमिंग स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाला,याबद्दल तिचे अभिनंदन करणारे पत्र:■■

१५,गंगाकुंज,

गोखले रोड़,

पुणे-४११ ०२९.

दि: १० फेब्रूवारी,२०२०.

प्रिय मोहिनी,

सप्रेम नमस्कार.

कशी आहेस तू? मी इथे ठीक करते.काल मला तुझी आई मार्केटमध्ये भेटली होती.त्यांच्याकडून समजले कि तुला स्वीमिंगच्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाला आहे.

ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला. मी माझ्या आई बाबांना ही बातमी सांगितली, ते सुद्धा खूप खुश झाले.

मोहिनी, मला माहित आहे कि तू या स्पर्धेसाठी खूप मेहनत केली होती आणि बघ, तुला तुझ्या परिश्रमाचे फळ शेवटी मिळालेच.

मोठमोठ्या आणि अनुभवी जलतरण पटूंना मागे टाकून तू या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला,याचा मला खूप अभिमान वाटतो.

मी आशा करते कि तुला नेहमी असेच यश मिळो.तुझ्या आई बाबांना माझा नमस्कार सांग.

तुझी मैत्रीण,

प्रिया.

Answered by babitabahadure
1

Answer:

Anubhavi kramank spardhet

Similar questions