Paus padla nahi tar Marathi nibandh
Answers
Answer:
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. भरपूर लोकांचा उदरनिर्वाह शेती या व्यवसायावर होतो.
शेतीमधून येणाऱ्या उत्पन्नामधून शेतकरी राजा आपल्या गरजा पूर्ण करत असतो.
परंतु आज माझ्या मनात विचार आला जर पाऊस पडला नाही तर काय होईल?
आज खूप थकून भागून कामावरून घरी येत होतो. पाऊसाचे भयंकर वातावरण तयार झाले होते. घरी जाण्याचा माझा कळवळीचा प्रयत्न सुरू होता. आकाशात वीज कडाडू लागल्या होत्या. आणि थोड्याच वेळात पावसाला सुरुवात झाली.
पावसाने भयंकर रूप घेतले होते.अतिशय जोराचा पाऊस झाला. भरपूर व वेळाने पावसाने स्वतःचा मारा कमी केला. पाऊस थांबला.
होऊन गेलेला पाऊस एवढा होता की सगळे रस्ते, ओढे, नाले, पूल पूर्णपणे पाण्याने भरून गेले होते. सगळ्यांनाच घरी जायची घाई झाली होती परंतु जाण्यासाठी मार्गच बंद झाले होते.
माणसांची आणि माझी होत असलेली धावपळ बघून असे वाटले की, पाऊस पडला नाही तर किती चांगले होईल.
पाऊस पडला नाही तर पाऊसामुळे होणारे नुकसान खूप कमी प्रमाणात होईल.